माद्रिद : कर्णधार राणी रामपालने अखेरच्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शनिवारी स्पेनचा ३-२ ने पराभव केला.भारताचा हा पहिलाच विजय आहे. या विजयामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरीही झाली. स्पेनने पहिल्या सामन्यात भारताला ३-० ने धूळ चारली होती. दुसरा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. चौथा सामना आज पहाटे खेळला जाईल. स्पेनने तिसºया मिनिटाला मारिया लोपेझच्या गोलमुळे सामन्यात आघाडी घेतली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये स्पेनचे वर्चस्व राहिले, तर भारतीय गोलकीपर सवितानेही अनेक हल्ले थोपवून लावले. भारताने दुसºया क्वार्टरमध्ये मुसंडी मारली. स्पेनला १९ व्या मिनिटाला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल होऊ शकला नाही. दुसरीकडे भारतासाठी गुरजित कौर हिने २८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत बरोबरी साधून दिली.तिसºया क्वार्टरमध्ये भारताने झकास सुरुवात केली. युवा स्ट्रायकर लालरेम्सीयानी हिने ३२ व्या मिनिटाला गोल नोंदवीत आघाडी मिळवून दिली. वंदना कटारियाला ४२ व्या मिनिटाला गोल नोंदविण्याची आणि स्वत:च्या नावे २०० वा गोल करण्याची संधी तिने गमावली.स्पेनची लोला रियेरा हिने ५८ व्या मिनिटाला गोल करताच सामना २-२ असा बरोबरीत आला. सामना अनिर्णीत संपणार, असे वाटत असतानाच खेळ संपायच्या एक मिनिटअगोदर राणीने गोल नोंदवीत भारताचा विजय साकारला.(वृत्तसंस्था)