ढाका : अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय हॉकी संघाला आशिया चषक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुध्द १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे सामन्यात एका गोलने पिछाडीवर पडलेल्या भारताने अखेरच्या मिनिटाला गोल करुन बरोबरी साधली. गुरजंत सिंगने हा निर्णायक गोल करुन भारताचा पराभव टाळला.स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताचा दक्षिण कोरियाविरुध्द विजय मानला जात होता. परंतु, कोरियाने जबरदस्त झुंज देताना भारताला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. सलग तीन विजयांसह खेळत असलेल्या भारतीय संघाचा उत्साह दुणावला होता. परंतु, कोरियन संघाने जबरदस्त बचाव करताना भारताला आक्रमणाची फारशी संधी दिली नाही. पहिले दोन क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर तिसºया क्वार्टरच्या शेवटच्या चार मिनिटांमध्ये जाँग जुन याने अप्रतिम गोल करत दक्षिण कोरियाला १-० अशी आघाडी मिळवूण दिली.यानंतर कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करत भारताला प्रचंड दबावाखाली आणले. भारतीयांनी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कोरियन बचाव भेदण्यात त्यांन सातत्याने अपयश आले. अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने कोरिया अनपेक्षित निकाल नोंदवणार हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु, अखेरच्या काही मिनिटांंमध्ये भारताने साहसी चाल खेळताना गोलरक्षक हटवून सर्व खेळाडूंनिशी कोरियावर हल्ला केला आणि केवळ एक मिनिट शिल्लक असताना गुरजंत सिंगने निर्णायक गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
शेवटच्या मिनिटात निर्णायक गोल कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करीत भारताला प्रचंड दबावाखाली आणले. भारतीयांनी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचा बचाव भेदण्यात त्यांना सातत्याने अपयश आले.अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने कोरिया अनपेक्षित निकाल नोंदवणार, हे जवळपास निश्चित झाले होते.परंतु, अखेरच्या काही मिनिटांंमध्ये भारताने साहसी चाल खेळताना गोलरक्षक हटवून सर्व खेळाडूंनिशी कोरियावर हल्ला केलाआणि केवळ एक मिनिट शिल्लक असताना गुरजंत सिंगने निर्णायक गोल करीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.