कराची : भारतात भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या एफआयएच पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेत सहभागी होण्याबद्दलची पाकिस्तान संघाची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली. या संघाला भारताचा व्हिसा देण्यात आला असून, एक नवा प्रायोजकही लाभला.भारतीय उच्चायुक्तांनी हॉकीपटूंना व्हिसा बहाल केला. याशिवाय नवा प्रायोजक स्पर्धेदरम्यान होणा-या खर्चापोटी संघाला ९० लाख रुपये देणार आहे. विश्वचषकात १६ संघ सहभागी होत आहेत. पाक हॉकी महासंघाचे सचिव शाहबाज अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार संघाच्या सर्व समस्यांवर तोडगा निघाला. मुख्य कोच तौकिर दार आणि सहायक कोच दानिश कलीम यांना मात्र व्हिसा नाकारण्यात आला. या दोघांचे अर्ज उशिरा जमा झाले होते. भारतीय उच्चायुक्तांनी या दोघांना व्हिसा मिळेल, असे स्पष्ट केले.
पाकिस्तान हॉकीसंघाला भारताचा व्हिसा, खर्चापोटी संघाला ९० लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 11:06 PM