शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदार... असरदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:29 PM

१२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शांत चित्ताने खेळलेल्या हॉकीपटूची निवृत्ती

नवी दिल्ली : १२ वर्षांआधी तो कुठलाही गाजावाजा न करता भारतीय संघात दाखल झाला. मधल्या फळीचा आधारस्तंभ ते संघाचा कर्णधार, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. भारतीय हॉकीचा स्टार, विश्व दर्जाचा दमदार मिडफिल्डर, पद्मश्री पुरस्कारप्राप्त दिग्गज खेळाडू अशा अनेक भूषणावह गोष्टी अनुभवणारा ३२ वर्षांचा सरदारसिंग संघातील सर्वाधिक फिट खेळाडू. पण, अचानक निवृत्ती जाहीर करणाºया या स्टारची खेळातील ‘एक्झिट’ही शांत-शांत ठरली.सरदारचे स्वप्न टोकियो आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हे होते; पण नियतीला ते मान्य नसावे. आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाच्या खराब कामगिरीनंतर या खेळाडूने हॉकीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. अनेक जाणकारांना असेही वाटते, की आशियाडमधील खराब कामगिरीसाठी सरदारला हेतुपुरस्सर ‘बळीचा बकरा’ बनविण्यात आले. त्याला निवृत्ती पत्करण्यास बाध्य करण्यात आले. पण, सरदारने स्वत: केलेले भाष्य विचारात घेण्यासारखे आहे. तो म्हणतो, ‘उपांत्य सामन्यात मलेशियाकडून झालेला पराभव निवृत्तीचा विचार करण्यास भाग पाडणारा ठरला.’तो पुढे म्हणाला, ‘‘मी खेळणे सुरू ठेवू शकलो असतो. आणखी काही वर्षे खेळू शकतो, असे मला स्वत:ला वाटते. पण, मलेशियाकडून झालेला पराभव सारखा विचलित करीत आहे. हा पराभव पचनी पडत नाही. पराभवानंतर अनेक दिवस मी झोपलोदेखील नाही. वारंवार विचार केल्यानंतरच मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे.’’सरदार हॉकी मैदानावर मुरब्बी खेळाडूसारखाच वावरला. यादरम्यान त्याने अनेकदा जेतेपदही मिळवून दिले. त्याच्या उपस्थितीत भारतीय संघाने २०१४च्या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण जिंकलेच; शिवाय २०१० आणि २०१८च्या स्पर्धेत कांस्यचा मानकरी ठरला. दोनदा राष्टÑकुलचे रौप्यविजेत्या संघात सरदारचा समावेश होता. यंदा ब्रेडा येथे चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला उपविजेतेपद मिळाले. याशिवाय सरदारच्या उपस्थितीत संघाने आशिया कप दोनदा जिंकला हे विशेष.सरदारकडे २००८मध्ये नेतृत्व सोपविण्यात आले. आठ वर्षे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर २०१६मध्ये नेतृत्वाची जबाबदारी त्याने गोलकीपर पी. आर. श्रीजेशकडे सोपविली. सर्वांत कमी वयात कर्णधार बनलेल्या सरदारने ३५० हून अधिक आंतरराष्टÑीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. फिटनेसमध्ये त्याला पर्याय नव्हता.सचिन तेंडुलकरने प्रेरणा दिलीनवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात जागा न मिळाल्याने आपण निराश झालो होतो. यावेळी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्याला प्रेरणा दिली, अशी माहिती हॉकीपटू सरदार सिंग याने दिली. सरदारने बुधवारी आंतरराष्टÑीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सरदार म्हणाला, ‘सचिनपाजी माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून त्यांनी मला खूप मदत केली आहे.’

टॅग्स :Sardar Singhसरदार सिंगHockeyहॉकी