मुंबई - भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस. त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करून हॉकीच्या या जादुगाराला देशभर मानवंदना देण्यात येत आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म प्रयाग (इलाहाबाद) येथे २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला होता. सहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर १९२२ मध्ये ध्यानचंद सैन्यदलात भरती झाले. तो पर्यंत त्यांच्या मनामध्ये हॉकीविषयी रुची नव्हती. मात्र, त्यानंतर त्यांनी इतिहास घडवला. ऑलिम्पिकमधील हॉकीची सलग तीन सुवर्णपदकं त्यांच्या नावावर आहेत. राष्ट्रीय दिनानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी त्यांना मानवंदना वाहिली आहे.
National Sports Day: मेजर ध्यानचंद यांना मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 12:57 PM