शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

नेहरु चषक : अंतिम सामन्यात हॉकी खेळाडूंमध्ये झाली हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:53 AM

पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक या संघातील ५६व्या नेहरुचषक हॉकी स्पर्धेची अंतिम लढत गाजली ती खेळाडूंमध्ये झालेल्या मारामारीमुळे.

नवी दिल्ली : पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक या संघातील ५६व्या नेहरुचषक हॉकी स्पर्धेची अंतिम लढत गाजली ती खेळाडूंमध्ये झालेल्या मारामारीमुळे. सोमवारी झालेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर आयोजकांनी दोन्ही संघांवर बंदी घातली. या प्रकरणानंतर हॉकी इंडियाने स्पर्धेच्या आयोजकांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.दोन्ही संघांनी सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधल्यानंतर हा सगळा राडा झाला. पीएनबी संघाने पंजाब पोलीस संघाच्या सर्कलमध्ये मुसंडी मारत चेंडूवर वर्चस्व राखले होते. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर खेळाडूंनी टर्फवरच एकमेकांवर हल्ला केला. खेळाडूंनी एकमेकांना ठोसे मारतानाच हॉकी स्टीकनेही प्रहार केला. यानंतर सामनाधिकारी मध्यस्ती करण्यासाठी मैदानावर आले. काहीवेळ सामना थांबविण्यात आल्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला आणि दोन्ही संघातून प्रत्येकी ८ खेळाडू खेळविण्यात आले. दोन्ही संघांच्या प्रत्येकी ३ खेळाडूंना लाल कार्ड दाखवून बाहेर करण्यात आले. अखेर पीनएबीने सामना ६-३ असा जिंकला.यानंतर जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा सोसायटीच्या व्यवस्थापक समितीने दोन्ही संघांवर बंदीची कारवाई केली. स्पर्धा आयोजकांनी सांगितले की, ‘दोन्ही संघांवर स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. पंजाब पोलीस संघावर चार वर्षांची, तर पीएनबीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय संघांच्या व्यवस्थापनाला दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगण्यात येईल.’ हॉकी इंडियाच्या सीईओ इलेना नॉर्मन यांनी सांगितले की, ‘आम्ही स्पर्धा आयोजकांच्या अधिकृत अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत. या आधारावर हॉकी इंडिया नक्कीच कठोर कारवाई करेल.’

टॅग्स :Hockeyहॉकी