शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

आर्थिक चणचण : पाक हॉकी संघ विश्वचषकास मुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 2:10 AM

येत्या २८ नोव्हेंबरपासून भारतात भुवनेश्वर येथे आयोजित होत असलेल्या पीएचएफ हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याच्या पाकिस्तान संघाच्या आशा धुळीस मिळताना दिसत आहेत.

कराची - येत्या २८ नोव्हेंबरपासून भारतात भुवनेश्वर येथे आयोजित होत असलेल्या पीएचएफ हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याच्या पाकिस्तान संघाच्या आशा धुळीस मिळताना दिसत आहेत. आर्थिक चणचण असल्याने खेळाडूंना भुवनेश्वरला पाठविणे तसेच खेळाडूंची थकबाकी चुकविण्यासाठी हॉकी महासंघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे(पीसीबी) उसणवारीने पैसे देण्याची विनंती केली होती, पण पीसीबीने नकार दिला.पाक हॉकीने नवे मुख्य कोच ताकिर दार आणि व्यवस्थापक हसन सरदार यांनी पीसीबी प्रमुख एहसान मनी यांच्याकडे विश्वचषकाच्या खर्चासाठी उसणवारीने पैशाची मागणी केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.दार म्हणाले,‘आम्ही आज गुरुवारी बैठक घेणार होतो. पण अत्यावश्यक कारणांमुळे मनी यांनी आम्हाला फोनवर माहिती देत पीएचएफला उसणे पैसे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. पीसीबीने तौकिर झिया यांच्या कार्यकाळात हॉकी महासंघाला दिलेले उसणे पैसे अद्याप परत आले नाहीत, असे मनी यांचे म्हणणे होते. तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकार आणि प्रायोजकांना आवाहन करू, असे मनी यांनी आश्वासन दिले.पीसीबीचे सचिव शाहबाज अहमद यांनी देखील हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याची राष्टÑीय संघाची शक्यता क्षीण होत असल्याची कबुली दिली आहे. पीएचएफने सरकारकडे ८० लाखाचे अनुदान मागितले होते. त्यावर अद्यापही उत्तर आलेले नाही. ते म्हणाले,‘आम्ही पंतप्रधान सचिवालयाला आठवडाभरात अनुदान देण्यासाठी पत्र लिहिले. काही उत्तर आले नाही तर संघाला भारतात पाठविणे शक्य होणार नाही. विश्वचषक १६ डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.शाहबाज पुढे म्हणाले,‘भारतात आम्ही संघ पाठवू शकलो नाही तर हॉकी विश्वात आमची प्रतिमा डागाळेल शिवाय एफआयएचकडून आर्थिक दंड देखील आकारला जाईल. सरकारने एफआयएचला थेट पैसे देण्याऐवजी खेळाडूंच्या हॉटेलचा खर्च आणि खेळाडूंची थकबाकी स्वत: द्यावी, असे आम्ही मनी यांच्यामार्फत पंतप्रधानांना आवाहन केले.’पाक खेळाडूंना आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी घेण्यात आलेल्या राष्टÑीय शिबिरातील दैनिक भत्त्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. दुसरीकडे भारतीय उच्चायुक्तालयाला पीएचएफने व्हिाासाठी आधीच अर्ज केला आहे. दोन वर्षांआधी व्हिसा नाकारण्यात आल्यामुळे भारतात आयोजित ज्युनियर विश्वचषकात पाक संघ सहभागी होऊ शकला नव्हता. विश्वचषकासाठी तयारी शिबिर बुधवारपासून लाहोर येथे सुरू देखील झाले आहे.(वृत्तसंस्था) 

टॅग्स :HockeyहॉकीPakistanपाकिस्तान