नवी दिल्ली : नव्या वर्षात अव्वल संघाविरुद्ध चांगला खेळ करण्याची संघाची प्राथमिकता असेल, असे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितले. अव्वल मानांकित संघाविरुद्ध सकारात्मक खेळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर ३३ महिला खेळाडू उद्या पासून बंगळुरु येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रावर सराव शिाबिरात एकत्र येतील.हरेंद्र म्हणाले, हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण वर्ष आहे. गेल्या वर्षी प्रदर्शन समाधानकारक राहिले. ज्यात आम्ही करिअरमधील सर्वाेत्कृष्ट मानांकन प्राप्त केले. आम्ही अव्वल दहा संघांत स्थान मिळवले. या संघात मोठे लक्ष्य गाठण्याचा आत्मविश्वास आहे.पुढील वर्षी राष्ट्रकु ल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा होतील. भारतीय संघाचा २१ सदस्यीय खेळाडूंचे शिबिर २४ जानेवारीपर्यंत असेल. भारतीय संघ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर कोरियामध्ये पाचव्या महिला आशिायाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होईल. त्यानंतर जूनमध्ये हा संघ स्पेन येथे रवाना होईल.संघ पुढीलप्रमाणे...गोलरक्षक : सविता, रजनी ई, स्वाती. बचावपटू : दीप ग्रेस इक्का, पी. सुशीला चानू, सुनीता लाकडा, गुरजित कौर, एच लाल रूआत फेली, नवदीप कौर, रश्मिता मिंज, नीलू दादिया. मध्यरक्षक- नमिता टोप्पो, निक्की प्रधान, दीपिका, करिश्मा यादव, रेणुका यादव, नवज्योत कौर, मोनिका, लिलिमा मिंज, नेहा गोयल, उदिता, एम लिली चानू, नीलांजली राय. आघाडीपटू- रानी, वंदना कटारिया, प्रीति दुबे, रीना खोकार, अनुपा बारला, सोनिका, लालरेम्सियामी, पूनम रानी, नवनीत कौर, नवप्रीत कौर.
अव्वल संघांविरुद्ध चांगला खेळ करण्याची प्राथमिकता - प्रशिक्षक हरेंद्र सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:01 AM