शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

2016 पासून महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाली!, कर्णधार राणी रामपालचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 8:35 AM

Rani Rampal : २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या मते टोकियो ऑलिम्पिकमधील अविस्मरणीय कामगिरीमुळे खेळाडूंना अत्यंत दडपणाच्या स्थितीतही शानदार खेळ करण्याचा मंत्र मिळाला. २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

‘हॉकी पे चर्चा’ या पॉडकास्टमध्ये  राणीने टोकियोत मिळालेले चौथे स्थान ते २०२१ मधील अनेक संस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. राणी म्हणाली,‘२०२१ आमच्यासाठी शानदार ठरले. आम्ही टोकियोत पदक जिंकू शकलो असतो.  असे करू शकलो नाही याची नेहमीसाठी खंत असेल. पदक मिळविण्याच्या फारच जवळ होतो. पराभव कसा झाला, हे काही काळ पचविणेदेखील जड गेले होते.

‘आम्ही २०१५ ला रिओ ऑलिम्पिकमध्ये १२ व्या आणि २०२० मध्ये टोकियोत चौथ्या स्थानावर राहिलो. भारतीय महिला हॉकीसाठी ही मोठी उपलब्धी आहे. कांस्य जिंकले नाही, पण कामगिरीत आमचे खेळाडू सरस ठरले. टोकियोतून मायदेशात परतलो तेव्हा चाहत्यांनी आमच्या कामगिरीचे कौतुक केले. काही चांगले केल्यामुळेच चाहत्यांचे प्रेम आणि प्रशंसा मिळू शकली. यामुळे भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास प्राप्त झाला,’ असे राणीने सांगितले.

‘टोकियोत उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव केल्यामुळे आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. यामुळे उपांत्य सामन्यात विश्वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाला नमवू शकतो, असे वाटले होते. उपांत्य सामना जिंकू शकलो असतो. सुरुवातीपासून आघाडी मिळवून प्रतिस्पर्धी संघावर दडपणही आणले होते. कोचने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात केली. पेनल्टी कॉर्नरही मिळविले, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरलो.  खेळाडूंसाठी ही शिकण्याची आणि अनुभव मिळविण्याची मोठी संधी ठरली. यापुढे आमचे खेळाडू बाद फेरीच्या सामन्यात संयमी खेळ करू शकतील. आम्ही निश्चितपणे उत्कृष्ट कामगिरी करू,’ असा मला विश्वास आहे.’     - राणी रामपाल

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत