शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

Tokyo Olympics: भारताच्या महिला हॉकी संघाचे आनंद महिंद्रांनी केले खास शब्दांत कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 1:13 PM

Tokyo Olympics Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली असली तरी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय महिला संघाचे खास शब्दांत कौतुक केले आहे.

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त खेळ केला. मात्र आज झालेल्या रोमांचक उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनच्या संघाकडून ३-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली असली तरी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय महिला संघाचे खास शब्दांत कौतुक केले आहे.

भारतीय महिला संघाने याआधी आपली सर्वोत्तम कामगिरी १९८० मध्ये केली होती. त्यावेळी भारतीय महिला संघाने चौथे स्थान पकावले होते. भारतीय महिला संघाचे कौतुक करताना आनंद महिंद्रा  आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज आम्ही अंडरडॉग्सना गुरुगुरताना पाहिले. आता त्यांचीही वेळ येईल. त्यांनी एका अशा क्रांतीला सुरुवात केली आहे जिला आता रोखता येणार नाही.

दरम्यान, आज झालेल्या कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने जोरदार खेळ केला होता.  या सामन्यात ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत ग्रेट ब्रिटनने हा सामना ४-३ असा फरकाने जिंकला आणि कांस्यपदकावर कब्जा केला.

सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनच्या संघाने आक्रमक खेळ केला. यादरम्यान, ब्रिटीश संघाला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र भारतीय गोलरक्षक सविता पुनिया आणि बचाव फळीने भक्कम बचाव करत ब्रिटीश आक्रमणाला थोपवून धरले. त्यामुळे पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस गोलफलक ०-० अशा बरोबरीत राहिला.मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ब्रिटिश खेळाडूंनी भारतीय बचावफळी भेदत जोरदार मुसंडी मारली. दुसऱ्या क्वार्टरमधील पहिल्याच मिनिटाला एलेना रायरने गोल करत ग्रेट ब्रिटनने गोल करून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सारा रॉबर्टसनने केलेल्या गोलच्या जोरावर ब्रिटनने आपली आघाडी २-० अशी वाढवली. मात्र ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. गुरजित कौरने भारताला मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत भारताची पिछाडी भरून काढत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर मध्यांतराला काही वेळ बाकी असताना २९ व्या मिनिटाला वंदना कटारियाने ब्रिटनचा बचाव भेदत गोल केला आणि भारताला ३-२ ने आघाडी मिळवून दिली.

मध्यांतरानंतरच्या खेळात ग्रेट ब्रिटनने पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केले आणि सामन्यात बरोबरी साधली. दरम्यान, तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही सेकंदात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा भारताला फायदा घेता आला नाही. त्यानंतर चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवत भारतावर दबाव आणला आणि सामन्यातील ४८ व्या मिनिटाला गोल करून ग्रेट ब्रिटनने सामन्यातर ४-३ अशी आघाडी घेतली. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021Hockeyहॉकी