शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 6:27 AM

Tokyo Olympics Update: ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे...

नवी दिल्ली : महत्त्वाच्या परिक्षेत हुशार मुलांकडून फार अपेक्षा असतात, त्यामुळे ढ किंवा ॲव्हरेज मुलांकडे कोणाचं लक्षच नसतं... तसेच टोकियोत दाखल होण्यापूर्वी हा महिला संघ ढ किंवा ॲव्हरेज मुलांमध्येच होता आणि नेमबाज, तिरंदाज, बॉक्सर हुशार विद्यार्थ्यांमध्ये होते. झालं उलटंच इथे ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे...राणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी ही २०१७ पासून उंचावत गेली अन् त्याचे पहिले फळ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाले. ३६ वर्षांनंतर भारतीय महिलांनी ऑलिम्पिकची पात्रता मिळवली अन् आज थेट उपांत्य फेरी गाठली. मला माझ्या आयुष्यातून सुटका हवी होती, घरात वीज नाही, झोपल्यानंतर कानाजवळ भुणभुण करणारे डास, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, पावसाळ्यात तर घराचे तलाव बनायचे... अशा परिस्थिती राणी रामपाल लहानाची मोठी झाली. कुटुंबीयांनी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जंगजंग पछाडले... वडिल कार्ट पुलर होते आणि आई घरकाम करायची.तिच्या घरानजीकच हॉकी अकादमी होती आणि मी दिवसाचे बरेच तास तेथे सराव करणाऱ्या खेळाडूंना बघण्यात घालवायचे, असे राणी सांगते. ती म्हणाली,'' मलाही तेव्हा खेळावं असे वाटायचे, परंतु पप्पा दिवसाला ८० रुपये कमवायचे अन् त्यांना हॉकी स्टीक्स घेणे परवडणारे नव्हते. 

मला हॉकी शिकवा, अशी विनवणी मला प्रशिक्षकांकडे करावी लागायची, अक्षरशः मी त्यांच्याकडे त्यासाठी भीकही मागितली, परंतु त्यांनी मला नकार दिला. कारण, मी कुपोषित वाटत होते आणि तुझ्या तेवढी ताकद नाही असे त्यांनी मला सांगितले.''

एक दिवस तिला तुटलेली हॉकी स्टीक्स मिळाली आणि तिनं सरावाला सुरुवात केली. तिच्याकडे सरावासाठीचे कपडेही नव्हते, तेव्हा ती सलवार कमीज घालून मैदानावर पळायची, तिला स्वतःला सिद्ध करायचे होते. बरेच प्रयत्न केल्यानंतर प्रशिक्षकांनीही तिला ट्रेनिंग देण्यास होकार दिला.

पण, हे सर्व जेव्हा घरी सांगितले, तेव्हा घरचे म्हणाले, ''लडकिंया घर का काम करती है. हम तुम्हे स्कर्ट पेहेन कर खेलने नही देंगे.'' पण, तिनं निर्धार केला अन् घरच्यांना सांगितले की, मी अयशस्वी ठरले, तर तुम्ही जे सांगाल ते करेन.'' ''पहाटे सरावाला सुरुवात व्हायची, परंतु आमच्या घरी घड्याळही नव्हते. आकाशाकडे बघून अंदाज बांधत मी सकाळी उठायचे. हॉकी अकादमीत प्रत्येक खेळाडूला अर्धा लिटर दूध आणणे कम्पलसरी होतं. माझ्या घरच्यांना फक्त २००ml दूध घेणेही परवडणारे होता आणि कोणाला न सांगता मी त्यात पाणी मिसळून न्यायचे. कारण मला खेळायचे होते,''असे राणी म्हणाली. तिचा हा निर्धार पाहून प्रशिक्षकांनीही तिच्यासाठी नवी हॉकी स्टीक्स व शूज खरेदी केले. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021