शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Tokyo Olympics: भारताकडून जपानचा ‘घरच्या मैदानावर’ पराभव, उपांत्यपूर्व फेरीआधी ५-३ ने मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 6:24 AM

Tokyo Olympics Updates: गुरजंतसिंगच्या दोन गोलमुळे भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीआधी अखेरच्या साखळी सामन्यात शुक्रवारी जपानचा ५-३ ने पराभव केला. या विजयामुळे संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.

टोकियो : गुरजंतसिंगच्या दोन गोलमुळे भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीआधी अखेरच्या साखळी सामन्यात शुक्रवारी जपानचा ५-३ ने पराभव केला. या विजयामुळे संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.भारताकडून हरमनप्रीतने १३ व्या, गुरजंत १७ आणि ५६, शमशेरसिंग ३४ तसेच नीलकांत शर्मा याने ५१ व्या मिनिटांना गोल केले. जपानकडून केंता तनाकाने १९ व्या, कोता वतानबे ३३ आणि काजुमा मुराता याने ५९ व्या मिनिटाला गोल केले. भारतीय संघाने अ गटात न्यूझीलंड, स्पेन, अर्जेंटिनाला हरविले आहे मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व सामना १ ऑगस्ट रोजी होईल.दोन्ही संघांनी वेगवान सुरुवात केली. पण जपानचे खेळाडू अधिक जलद होते. १३ व्या मिनिटाला हरमनने पेनल्टीवर गोल नोंदवून खाते उघडले. टोकियोत हरमनचा हा चौथा गोल आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने आक्रमक खेळ केला. यावेळी गुरजंतने सिमरनजीतच्या पासवर गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली. प्रत्युत्तरात जपानने हल्ला केला. भारतीय बचावफळी भेदून तनाकाने गोल नोंदविला. यामुळे मध्यंतरापर्यंत भारताची आघाडी २-१ अशी राहिली.तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने सुरुवातीला आणखी एक गोल नोंदवून २-२ अशी बरोबरी साधली.यानंतर सावध झालेल्या शमशेरने नीलकांत शर्माच्या पासवर सुरेख गोल करीत पुन्हा आघाडी मिळवून दिली. दरम्यान गोलकीपर श्रीजेश यानेही प्रतिस्पर्धी खेळाडूंचे हल्ले परतवून शानदार कामगिरी केली. ५६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनच्या पासवर गुरजंतने स्वत:चा दुसरा गोल केला. तीन मिनिटानंतर काजुमा मुराता याने तिसरा गोल नोंदविला खरा मात्र पराभवाचे अंतर कमी होऊ शकले नाही. 

महिला हॉकीत भारताच्या आशा कायमटोकियो : ऑलिम्पिकमधील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने १-० अशी बाजी मारत आयर्लंडला पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर देत सामन्यात गोलशून्य बरोबरी राखली होती. अखेरच्या काही मिनिटांमध्ये नवनीत कौरने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने आघाडी मिळवीत विजय मिळविला.या महत्त्वपूर्ण विजयासह भारतीय संघाने बाद फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या आहेत. विशेष म्हणजे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने तब्बल १४ पेनल्टी कॉर्नर मिळविले होते; पण एकही पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावण्यात भारतीयांना यश आले नाही. सामन्यातील एकमेव गोल नवनीतने केला तो ५७ व्या मिनिटाला. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना तिने केलेला गोल निर्णायक ठरला. सामना संपण्याच्या तीन मिनिटे आधी कर्णधार राणी रामपालने नवनीतकडे अचूक पास देत तिला गोल करण्याची संधी निर्माण करून दिली. ही संधी अचूकपणे साधत नवनीतने चेंडू गोलजाळ्यात धाडत भारताचा विजय साकारला.सलग तीन सामने गमावल्यानंतर भारताला आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळविणे अनिवार्य होते आणि यासाठी त्यांना ५७ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. भारतीयांनी यावेळी गोल करण्याच्या अनेक संधीही निर्माण केल्या. मात्र, गोल करण्यात त्यांना यश आले नाही.याआधी भारताला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलँडविरुद्ध १-५, जर्मनीविरुद्ध ०-२ आणि गतविजेत्या ग्रेट ब्रिटनकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला होता. 

टॅग्स :Hockeyहॉकीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021