नवी दिल्ली : हॉकी इंडियाच्या दोन कर्मचाऱ्यांना कोविड-१९ व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त आहे. दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हॉकी इंडियाचे मुख्यालय १४ दिवसासाठी सील करण्यात आले आहे. कुठल्या भारतीय क्रीडा संस्थेत कोविड-१९ची लागण झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
हॉकी इंडियाच्या मते पॉझिटिव्ह आढळलेला त्यांचा एक कर्मचारी अकाऊंट विभागासोबत जुळलेला आहे तर दुसरा ज्युनिअर फिल्ड आॅफिसर आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना दिल्ली सरकारच्या निर्देशानुसार घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतीय आॅलिम्पिक असोसिएशन (आयओए) व आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा म्हणाले,‘ सर्व राज्य आॅलिम्पिक संघटना व आयओएने आपल्या कर्मचाºयांची चाचणी करणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)बत्रा स्वत: १७ दिवसासाठी दिल्लीतील ग्रेटर कैलाशस्थित आपल्या निवासस्थानी क्वारंटाईन झाले आहेत. त्यांचे वडील २५ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉकी इंडियाचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती दिली. फेडरेशनने शुक्रवारी ३१ कर्मचाºयांची चाचणी करवून घेतली होती.