शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

भारतीय हॉकी संघांनी केला ‘गोल्डन धमाका’, पुरुष व महिला गटात पटकावले सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 2:08 AM

न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात उभय संघांच्या खेळाडूंनी मध्यरेषेजवळ खेळण्यावर अधिक भर दिला.

टोकियो: आॅलिम्पिक सराव स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी न्यूझीलंडवर ५-० असा दणदणीत विजय मिळवून विजेतेपद पटकावले. या विजयामुळे भारतीय संघाने स्पर्धेतील राऊंड रॉबिन फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा वचपादेखील काढला. त्याचवेळी भारताच्या महिला संघानेही सुवर्ण पदक जिंकताना अटीतटीच्या लढतीत जपानचा २-१ असा पराभवकेला.न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात उभय संघांच्या खेळाडूंनी मध्यरेषेजवळ खेळण्यावर अधिक भर दिला. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल होऊ शकला नाही. कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करून सातव्या मिनिटाला खाते उघडले.शमशेर सिंगने १८ व्या मिनिटाला गोल करून आघाडी दुप्पट केली. त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात झटपट तीन गोल झाले. निलकांत शर्माने २२ व्या मिनिटाला, गुरसाहबजीतसिंगने २६ व्या आणि मनदीपसिंगने २७ व्या मिनिटाला गोल करीत भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकवली. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. (वृत्तसंस्था)बचावफळीचीही शानदार कामगिरीभारताच्या महिलांनी आपला चमकदार खेळ कायम राखताना अंतिम सामन्यात जपानला २-१ असे नमविले. नवज्योत कौरने ११व्या मिनिटाला, तर लालरेमसियामी हिने ३३व्या मिनिटाला गोल करत भारताच्या सुवर्ण पदकामध्ये मोलाचे योगदान दिले. मिनामी शिमिजू हिने जपानकडून १२व्या मिनिटाला एकमेव गोल केला. आक्रमक सुरुवात केलेल्या भारताला हळूहळू जपानकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. भारताच्या बचावफळीनेही अप्रतिम कामगिरी करत जपानी आक्रमण परतावले.

टॅग्स :HockeyहॉकीNew Zealandन्यूझीलंड