नवी दिल्ली – आयपीएस तृप्ती भट देशातील यशस्वी अधिकाऱ्यांमधील एक नाव. ९ वीत असताना तिला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली. भारताच्या मिसाईल मॅनने तिला प्रेरणादायी गोष्टींचे पुस्तक दिले होते. त्यातून प्रेरणा घेऊन तृप्तीने भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोसह १६ सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या. काही प्रतिष्ठित खासगी कंपन्यांनीही तिला ऑफर दिली होती. परंतु त्यालाही तिने नकार दिला. पहिल्याच प्रयत्नात तृप्तीला सिव्हिल सेवा परीक्षेत यश मिळाले. त्यानंतर तिचा आयपीएस अधिकारी बनण्याचा प्रवास सुरू झाला.
तृप्ती भट अल्मोडा तालुक्यातील असून तिचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला. ती चौघा भावंडांमध्ये मोठी आहे. बियरशेबा स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केला. १२ वीच्या शिक्षणासाठी तिने केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला. इंटरमीडिएटच्या शिक्षणानंतर तृप्ती पंतनगर विश्वविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअर बी.टेक करायला गेली. तृप्तीने इस्त्रोसह ६ सरकारी नोकरीच्या परीक्षा दिल्या. परंतु तिचे मन यूपीएससी परिक्षेत लागल होते. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या भेटीनंतर तिने आयपीएस अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचे म्हणून तिने अनेक सरकारी नोकऱ्यांची ऑफर नाकारली.
तृप्ती भट पहिल्याच प्रयत्नात सीएसई परीक्षा पास केली. त्यानंतर यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा २०१३ मध्ये १६५ व्या रँकने तिने यश मिळवले. तृप्तीने मॅरेथॉन आणि राज्यस्तरीय बँडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडेल जिंकले होते. ती ताईक्वांडो आणि कराटेमध्येही माहीर आहे.