कॉलेज ड्रॉपआऊट होऊनही एक मुलगी लग्झरी लाईफ जगत आहे. तिच्याकडे महागड्या कार आहेत. अवघ्या ६ महिन्यात या मुलीने तब्बल ३ मिलियन डॉलर म्हणजे २५ कोटींची कमाई केल्याचा तिचा दावा आहे. हे सर्व तिने कॉलेज सोडल्यानंतर केले. ती कॉलेजमधून ड्रॉपआऊट आहे. २१ वर्षीय इनाया मकमिलन अमेरिकेच्या सेंट लुईसची राहणारी आहे. तिने एक यूट्यूब व्हिडिओ बनवला आणि ज्यातून तिने ६ महिन्यात ३ मिलियन डॉलर कमावले.
न्यूयॉर्क पोस्ट रिपोर्टनुसार, इतक्या कमी वयात तिने इतकी बक्कळ कमाई केली. मी सुरुवातीला भाड्याच्या पैशाने कमाई केली. माझ्याकडे स्वत:ची प्रॉपर्टी नाही. परंतु आता मी ११ Airbnbs भाड्याने दिले आहेत. हे काम करण्यापूर्वी तिने ई कॉमर्स, ड्रॉप शॉपिंग आणि स्ट्रॉक ट्रेडिंगचं काम केले. परंतु इथं रेंटल आर्बिट्रेज करायला शिकले. सुरुवातीला हे पूर्णत: समजू शकले नाही. परंतु हळूहळू शिकले. माझ्याकडून चुकाही झाल्या असं ती म्हणाली.
इनिया काय काम करते? इनाया कमी पैशात हॉटेल घेऊन ते अधिक पैशात इतरांना भाड्याने देते. त्यातून जे पैसे वाचतात ती तिची कमाई आहे. त्याशिवाय दुसऱ्यांना श्रीमंत होण्याचे धडे ती देते. तिचा एक यूट्यूब चॅनेल आहे. त्यात तिने तिच्या कमाईची पद्धत लोकांना शेअर केली. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत मुलीने Airbnb मधून महिन्याला ४०, ५० आणि ६० हजार डॉलर कमवल्याचा दावा केला. कोचिंग बिझनेसमधूनही इनायाची कमाई इनायाने कोचिंग बिझनेससाठी ब्रेसन नावाच्या व्यक्तीला पार्टनर म्हणून निवडला. इनायाला महिन्याला १ मिलियन डॉलर कमाई करण्याची इच्छा होती. जी पूर्ण झाली. फक्त नोव्हेंबर महिन्यातच १ मिलियन डॉलर कमाई केली. वर्ष संपताच Airbnbs आणि कोचिंगमधून ३ मिलियन डॉलर कमावले. हा बिझनेस पुढे वाढवण्याचा तिचा मानस आहे.