शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

दुर्गम गडचिरोलीचा हितेश ‘फ्लाईंग ऑफिसर’; फायटर प्लेनमधून आकाशात उंच झेप घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 7:32 AM

देशातील १३ जणांमध्ये चौथ्या क्रमांकाने निवड

एटापल्ली/चामोर्शी (गडचिरोली) : देशात मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच्या मातीत जन्म घेतलेला हितेश सोनटक्के हा युवक आता भारतीय हवाई दलाच्या फायटर प्लेनमधून आकाशात उंच झेप घेणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू होईल. 

हितेशने बी. टेक. (सिव्हिल) ही पदवी घेतली आहे. शालेय जीवनापासूनच त्याच्यावर भारतीय वायुसेनेचा प्रभाव होता. बारावीनंतर तो ‘एनडीए’ची परीक्षाही उत्तीर्ण झाला होता, पण मुलाखतीत त्याला अपयश आले. मात्र त्यामुळे खचून न जाता त्याने बी. टेक. पूर्ण केल्यानंतर ‘सीडीएस’ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करत आपले ध्येय गाठले. भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होणारा हितेश गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव आहे. त्यामुळे तो सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. हितेश हा मालेर चक येथील प्रतिष्ठित व्यापारी स्व. जनार्धन कुकडे यांचा नातू (मुलीचा मुलगा) आहे.

छोट्याशा गावात जन्म, नागपूर-पुण्यात शिक्षण मोर्शी तालुक्यातील मालेर चक (कुनघाडा रै.) या छोट्याशा गावी आपल्या मामाकडे जन्म झालेल्या हितेशचे गाव एटापल्ली आहे. त्या गावात त्याचे वडील मुरलीधर सोनटक्के यांचे मेडिकल स्टोअर आहे. गावात कॉन्व्हेंट नसल्याने त्यांनी हितेशला घोट येथील महात्मा गांधी कॉन्व्हेंटमध्ये टाकले. चौथ्या वर्गापर्यंत तिथे शिक्षण झाल्यानंतर दहावी-बारावीचे शिक्षण नागपूर येथे घेतले. दोन्ही परीक्षेत त्याला ९५ टक्के गुण होते. त्यानंतर पुणे येथील एमआयटी काॅलेजमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. यादरम्यान त्याने एनसीसीच्या एअर विंगमधून ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षाही उत्तीर्ण केली. स्किट शूटिंगमध्ये तो देशभरातील कॅडेट्समध्ये पहिला आला होता. हितेश याने एसएसबी इंटरव्ह्यू आणि वैद्यकीय चाचणीही यशस्वीपणे पार केली असून तो येत्या ११ जुलै रोजी हैदराबादच्या एअर फोर्स अकादमीत प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे.