शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

सलाम तिच्या धाडसाला! १० दिवसांची मातृत्व रजा; ११ व्या दिवशी चिमुकल्यासह ड्युटीवर पोहचल्या IPS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 7:44 AM

International Women's Day 2023: संपूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या एसपी नितिका गेहलोत या महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात एक प्रसिद्ध व्यक्ती बनल्या आहेत.

हिसार - अनेक काळापासून समाजात शोषणाचा शिकार बनलेल्या महिला आज प्रत्येक क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. नोकरी असो वा उद्योग सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाताना दिसत आहेत. काही महिला मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठत आज समाजात आदर्श बनून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशीच एक आदर्श असलेली हरियाणातील हांसी पोलीस जिल्हा अधिकारी डॉ. नितिका गहलोत. 

गुन्हेगारी बहुल जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हानात्मक काम डॉ. नितिका गहलोत पार पाडत आहेत. कामाप्रती असलेली निष्ठा आयपीएस अधिकारी नितिका गहलोत यांच्या एका उदाहरणावरून दिसून येते, ती म्हणजे केवळ १० दिवसांच्या मॅटरनिटी लिव्हनंतर ११ व्या दिवशी नवजात बालकासह कार्यालयात ड्युटीवर हजर झाल्या होत्या. नितिका गहलोत यांच्या कार्याबद्दल कर्मचाऱ्यांसह स्थानिक जनताही कौतुक करत होती. 

महिलांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या नितिका गहलोत आजही मुलीला घेऊन कार्यालयात जनतेच्या समस्या ऐकून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. कामाची वेळ संपल्यानंतरही लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्या कार्यालयात हजर राहतात. मागील अडीच वर्षापासून हांसी पोलीस जिल्ह्याची कमान आयपीएस अधिकारी नितिका गहलोत संभाळत असून या काळात त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवला आहे. छोट्या छोट्या घटनांवर त्या स्वतः लक्ष ठेवतात. गेल्या वर्षी, संपूर्ण राज्यात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे सोडवण्यात हांसी जिल्हा दुसऱ्या आणि अमली पदार्थांची प्रकरणे पकडण्यात तिसऱ्या नंबरवर होता. याशिवाय ४ किलो अफूचे हायप्रोफाईल प्रकरणही एसपी नितिका गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी पकडले. याप्रकरणी महिला गुंडाला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. वाहनचोरीच्या घटनांमध्येही त्यांच्या नेतृत्वाखाली हांसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

संपूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या एसपी नितिका गेहलोत या महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात एक प्रसिद्ध व्यक्ती बनल्या आहेत. एसपींच्या कामाप्रती समर्पित भावनेने परिसरातील महिलांना प्रेरणा मिळत आहे. मात्र, स्वत: एसपींना याबाबत विचारले असता, मी माझे सामान्य कर्तव्य बजावत असल्याचे सांगितले. आयपीएस अधिकारी असूनही त्यांचे राहणीमान अत्यंत साधेपणाचं असून कर्मचाऱ्यांशी अतिशय नम्रतेने वागतात.  

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन