नवी दिल्ली - तुम्ही काही लोकांचे अजब कॉम्बिनेशन ऐकले असेल. काहींना चहासोबत मिठाई खाणे, जेलीसोबत बर्गर खाणे पसंत आहे. मुंबई महाराष्ट्राच्या अनेक भागात पावभाजीसोबत कदाचितच कुणाला आईस्क्रीम विकताना पाहिले असेल. १९८४ मध्ये मुंबईतील रघुनंदन कामत यांनी सुरुवात केली. भारतातील लोकांना मिठाईचे किती वेड आहे हे कामत यांना ठाऊक होते. लोकांना जेवल्यानंतर गोड पदार्थ खायला आवडतात यातूनच कामत यांना आयडिया सुचली.
कामत यांनी गरम आणि मसालेदार रेसिपीनंतर ग्राहकांना काही थंड खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही आयडिया लोकांना आवडली. कामत यांनी जुहू कोळीवाडा परिसरात २०० स्क्वेअर फूटात छोटेसे दुकान उघडले आणि पहिल्या वर्षी ५ लाखाचा व्यवसाय केला. १ वर्षानंतर त्यांनी आईस्क्रिमचा ब्रँड बनवण्यासाठी पावभाजी विक्री करणे बंद केले. कामत यांनी विविध स्वादिष्ट फळांनी बनलेली आईस्क्रीम विकण्याचा निर्णय घेतला. त्यात कस्टर्ड, काजू किसमिस, आंबा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीसारख्या चवीचा समावेश होता.
२०२१ पर्यंत नॅच्युरल हा आईस्क्रीम ब्रँड देशाच्या विविध शहरात जवळपास १३५ आऊटलेटपर्यंत पसरला. आता कामत यांची कंपनी नॅच्युरलमध्ये २० पेक्षा अधिक फ्लेवरमध्ये आईस्क्रिम विक्री करत आहे. २०२० मध्ये नॅच्युरल आईस्क्रिमने जवळपास ३०० कोटींचा पल्ला पार केला. ग्राहकांची पसंती बनलेल्या नॅच्युरल आईस्क्रिम ब्रँड हा भारतातील टॉप १० बँडपैकी एक आहे.
कामत यांनी नॅच्युरल आईस्क्रिम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आजूबाजूच्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहिल्या. त्यात चांगल्या प्रतीची फळे वापरली, आईच्या बुद्धीचा वापर करत ग्राहकांच्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेतल्या. कामत यांच्या या प्रयत्नांमुळे नॅच्युरल आईस्क्रीमने ग्राहकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. १२५ कर्मचाऱ्यांची क्षमता असलेले नॅच्युरल आईस्क्रीम दररोज २० टन आइस्क्रीम तयार करते. मूळचे कर्नाटकचे, कामत सात भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्याची आई गृहिणी होती आणि वडील फळे विकायचे. ८ जणांच्या कुटुंबाने त्यांच्या १ एकर जमिनीवर एकदा फळांची लागवड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. कामत यांनी शिक्षण घेतले नाही. वडिलांना फळे विकण्याच्या व्यवसायात मदत करत असल्याने शाळेतील अभ्यासापासून दूर राहिले. वडिलांसोबत शेतात आणि बाजारात फळांच्या कामामुळे कामत यांना फळांची विशेष माहिती मिळाली. कामत १४ वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब मुंबईत आले.
बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर कामत यांना मोठ्या भावासोबत काम करण्यास सांगण्यात आले. मोठ्या भावाच्या गोकुळ रिफ्रेशमेंटमध्ये काही दिवस काम केल्यानंतर सर्व भाऊ वेगळे झाले आणि कामत यांना रेस्टॉरंटचा एक भाग मिळाला. कामत यांनी ३.५ लाखांच्या भांडवलाने सुरू केलेले नॅच्युरल आईस्क्रीम हे बाजारातील इतर आइस्क्रीमपेक्षा वेगळे होते. त्यातील नैसर्गिक फळ आणि चवीमुळे कामत यांनी पहिल्या सुट्टीतच १००० कप आइस्क्रीम विकले.