जालना - एका जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेली शीतल जुंबड आता थेट अमेरिकेत सीनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार आहे. शीतलनं पुण्याच्या एका इंजिनिअरींग कॉलेजमधून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढचं शिक्षण तिने अमेरिकेत घेतले. ना एनआयटी ना आयआयटीचं प्रमाणपत्र असणाऱ्या शीतलला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीनं जॉब ऑफर केला. त्यामुळे जालनाची ही लेक अमेरिकेत नोकरीला चालली आहे. शीतलचा हा प्रवास कसा आहे हे जाणून घेऊया.
शिक्षक बाबासाहेब जुंबड यांची कन्या शीतलने न केवळ कुटुंबातील तर जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगाराचा रेकॉर्ड मोडला आहे. शीतलनं तिचे प्राथमिक शिक्षण बालविकास प्राथमिक विद्यालय जालनातून पूर्ण केले. त्यानंतर पाचवीत सरस्वती भवन हायस्कूल, ६ ते १० वी जवाहर नवोदय विद्यालय परतूर येथून पूर्ण केले. त्यानंतर १२ वीच्या शिक्षणानंतर शीतल बीटेकच्या शिक्षणासाठी पुण्यात आली. तिथे वीआयटी इंजिनिअरींग कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. याठिकाणी आवश्यक जीआरआय आणि टीओईएफएल या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या.
लेकीच्या या यशावर बाबासाहेब जुंबड यांना गर्व आहे. शीतलने सहाय्यक प्रोफेसर म्हणूनही काम केले त्यानंतर अमेरिकेत तिने मास्टर्स पूर्ण केले. त्यात तिने पीजी कॅम्प्युटरचे शिक्षण घेतले. अलीकडेच शीतलची कॅलिफोर्नियात ज्येष्ठ सिस्टम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका कंपनीत निवड झाली. शीतलने जीआरई आणि टीओईएफएलच्या परीक्षेनंतर अमेरिकेतील स्टेट यूनिवर्सिटी ऑफ यूटामध्ये प्रवेश घेतला. याठिकाणी डीग्रीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच शीतलला जॉब ऑफर मिळाली. तिथे तिला तब्बल ३ कोटी ६० लाखांच्या पॅकेजसाठी निवड झाली.
जालनातून थेट अमेरिकेपर्यंत प्रवास करणाऱ्या एका शिक्षकाची मुलगी शीतल जुंबड ही स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी रोल मॉडेल बनली आहे. तिचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. जुंबड कुटुंबातील तीन मुले चांगले शिक्षित आहेत. मुलगा पुण्यातील वीवीआटीमध्ये इंजिनिअरींग करतो. तो बीटेकच्या पहिल्या वर्षाला आहे तर दुसरी मुलगी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे.