शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

"नवरा मृत्यूच्या उंबरठ्यावर अन् बायको नाचतेय..."; कारण ऐकून तिचं कौतुकच वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 12:49 PM

त्यात पतीला कॅन्सर झाल्याचं कळाले तेव्हा तिच्या आयुष्याने वळण घेतले. तेव्हा तिला दीड वर्षाची मुलगीही होती.

नवी दिल्ली - ही कहाणी आहे अशा महिलेची, जिला लोकांनी विशेषत: नातेवाईकांनी बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. जेव्हा या महिलेचा पती कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढत होता तेव्हा ही महिला व्हिडिओ बनवून सोशल मीडियात टाकत होती. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसायची. तिच्या या कृत्यामुळे नातेवाईकांनी सातत्याने सासू-सासऱ्यांना फोन करून सुनावले पण कुणीही तिने हे करण्यामागचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला नाही. या महिलेचे नाव पीहू यादव. जी सोशल मीडियावरील डान्सर, यूट्यूबर म्हणून प्रसिद्ध चेहरा बनली आहे. 

पीहू तिच्या देशी अंदाज आणि हरियाणवी डान्ससाठी फेमस झालीय. आज लाखो लोक तिला फॉलो करतात. परंतु यशाचं हे शिखर गाठण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जोश टॉक्समध्ये या महिलेने तिची गोष्ट सांगितली आहे. पीहू दिल्लीमधील आहे. तिचं लग्न नजफगढच्या छोट्या गावात करण्यात आले होते. ती मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. डान्स असो अथवा कुठला खेळ लहानपणापासून तिला समस्या उद्भवल्या. तिला गायनात करिअर बनवायचं होते. परंतु कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही. कमी वयात पीहूचं लग्न करण्यात आले. त्यात पतीला कॅन्सर झाल्याचं कळाले तेव्हा तिच्या आयुष्याने वळण घेतले. तेव्हा तिला दीड वर्षाची मुलगीही होती. पीहूने हा कठीण काळही सोसला आणि पतीला बरे करूनच घरी घेऊन आली. 

नातेवाईकांनी साथ दिली नाहीपतीच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. तिच्या घरातील बचतीचे सर्व पैसे जवळपास संपलेच होते. पीहूने नातेवाईकांकडे मदतीची याचना केली. तेव्हा एका मित्राकडून अशा प्लॅटफॉर्मची माहिती मिळाली ज्यावर व्हिडिओ बनवल्यावर पैसे मिळतात. पीहूने सुरुवातीला डान्स व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. पतीला वाचवण्याची केवळ १० टक्केच संधी होती. तेव्हा पतीकडून तिने व्हिडिओ बनवण्याची परवानगी घेतली. पतीनं पाठिंबा दिल्यानंतर पीहूने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. पहिल्या, दुसऱ्या व्हिडिओला रिपॉन्स मिळाला नाही. जितके व्हिडिओ अपलोड करायची त्या आठवड्याचं पेमेंट मिळायचं. मग पीहूने जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. 

व्हिडिओमधून कमाईतिने पुढे सांगितले की, तिसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट केला आणि पुढील दिवशी सकाळी व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजले. त्यावर १२ लाख व्ह्यूज आले होते. यानंतर तिला आठवड्याच्या शेवटी ४००० रुपये, दुसऱ्या आठवड्यात ६००० रुपये आणि नंतर तिसऱ्या आठवड्यात ३०००० रुपये मिळाले. नंतर तिला कॅटेगिरी निवडण्यास सांगितली तेव्हा तिने डान्स निवडले. या काळात ती प्रसिद्ध झाली. नातेवाईकांनी घरी फोन करण्यास सुरुवात केली. ती नाचणारी आहे, पैशांसाठी करतेय. लाज वाटत नाही. नवरा मरणाच्या दारावर आहे आणि हीचं पाहा. ती व्हिडिओ बनवतेय. ती त्याला सोडून पळून जाईल. नवरा आजारी पडला आहे, ती त्याचा फायदा घेईल असं बोलू लागले. 

...अन् नवऱ्याची तब्येत सुधारलीपीहू म्हणाली, माझ्या मुलीला रोज घरी सोडून मी पतीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात असे. प्लेटलेट्स/रक्तासाठी वणवण भटकत होते. लोकांनी मदत करण्यास नकार दिला. नातेवाइकांनी साथ देण्याऐवजी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी खचली तेव्हा पतीने सांगितले की मी कोणत्याही परिस्थितीत तुझ्यासोबत आहे. इथूनच मला धीर आला. अशा परिस्थितीत मी व्हिडिओच्या पैशातून सर्व गरजा पूर्ण केल्या. सहा महिन्यांनी माझा नवरा बरा होऊन घरी आला. आर्थिक संकटही दूर झाले आणि नवऱ्याची प्रकृतीही आता चांगली आहे.