तालिबाननंअफगाणिस्तानवर रविवारी ताबा मिळवला होता. त्यानंतर अफगाणिस्तानचेराष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता अफगाणिस्तानचे उप-राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत:च्या नावाची घोषणा अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून केली.
मंगळवारी अमरूल्लाह सालेह यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील घोषणा केली. "अफगाणिस्तानच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांची अनुपस्थितीती, पलायन, राजीनामा किंवा मृत्यू अशा परिस्थितीत उप राष्ट्राध्यक्ष हे काळजीवाहू राष्ट्राध्यकांचा पदभार स्वीकारू शकतात. या वेळी मी आपल्या देशात आणि वैध काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांच्या समर्थनासाठी आमि त्यांच्या सहमतीसाठी संपर्क साधत आहे," असंही अमरूल्लाह सालेह म्हणाले.