अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार आल्यापासून तेथे विविध संकटे आली असून त्यात सर्वात मोठे संकट हे भूकबळीचे आहे. हे संकट आणखी भीषण पातळी गाठण्याची भीती आहे. विविध देशांनी तेथील नागरिकांना मदत न केल्यास अफगाणमध्ये मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. भीषण दुष्काळाचा सामना करत असलेल्या या देशात यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत १० लाख मुलांचा भूकबळी जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.नेमके काय आहे संकट?जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अफगाणमध्ये यावर्षीच्या अखेरपर्यंत भीषण अन्नटंचाई निर्माण होऊ शकते.या टंचाईमुळे ३२ लाख मुले कुपोषणग्रस्त होतील. त्यातील दहा लाख मुले दगावण्याची भीती आहे.का घटतोय हा अनर्थ?तालिबानींनी १५ ऑगस्ट रोजी अफगाणवर कब्जा मिळवला. राजधानी काबूल त्यांनी ताब्यात घेतले व आपले सरकार स्थापन केले.या तालिबानी सरकारला अनेक देशांनी मान्यताच दिलेली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळणेही बंद झाले आहे.अमेरिका व युरोपीय देश आतापर्यंत अफगाणला अर्थसहाय्य करत होते. पण त्यांनी ती मदत बंद केली आहे.पैसाच नसल्याने अफगाण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. त्यामुळे टंचाई आणखी वाढणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.२४ हजार मुलांना एकच आजारअफगाणमधील २४ हजार मुलांना मीझल्स नावाचा आजार झाला आहे. तो आणखी वाढेल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या काबूलमधील प्रवक्ता मार्गारेट हॅरिस यांनी व्यक्त केली आहे.अर्थव्यवस्थाच डबघाईस आल्याने तेथील अनेक कर्मचारी अनेक महिन्यांपासून पगारापासून वंचित आहे. त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्थाही कोलमडली आहे.
तब्बल १० लाख मुलांचा होणार मृत्यू?; जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 5:41 AM