१०० फूट उंच रॉकेट शुक्रवारी सायंकाळी कॅलिफोर्नियाच्या वॅंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसमधून उडालं. त्यासोबतच हे रॉकेट तयार करणाऱ्या स्टार्टअप कंपनी फायरफ्लायला आशा होती की, हे रॉकेट यशस्वी उड्डाण घेणार. प्लॅन होता की, रॉकेटला पृथ्वीच्या कक्षेपर्यं पाठवायचं. लॉंन्च तर बरोबर झालं, पण वर गेल्यावर रॉकेटचा स्फोट झाला. प्रशांत महासागरावर या रॉकेटच्या चिंधड्या उडाल्या.
फायरफ्लाय कंपनीच्या रॉकेटचं लॉंचिंग योग्य प्रकारे झालं होतं. ते वेगाने वर गेलं. जशी त्याने सुपरसोनिक वेग पकडला. ते जोरात फिरू लागलं होतं. नंतर ते जमिनीकडे येऊ लागलं होतं. तात्काळ अमेरिकन स्पेस फोर्सच्या अधिकाऱ्यांनी फायरफ्लायला आदेश दिला की, या रॉकेटला हवेतच नष्ट करा. लगेच इमरजन्सी अबॉर्टचा मेसेज जारी झाला. मास्टर कंट्रोल सेंटरमध्ये बसलेल्या रॉकेट इंजिनिअरने इमरजन्सी अबॉर्ट बटन दाबलं आणि रॉकेटचा हवेत स्फोट झाला. त्यावेळी मोठा आगडोंब उडाला.
जेव्हा रॉकेट हवेतच नष्ट केलं जातं तेव्हा त्याला इमरजन्सी अबॉर्ट म्हटलं जातं. जेणेकरून रॉकेटने जमिनीवर येऊन नुकसान पोहोचवू नये. अशाप्रकारचं नुकसान होणारी फायरफ्लाय ही काही पहिली कंपनी नाही. कॅलिफोर्नियातील स्टार्टअप कंपनी अस्त्र(ASTR) ने गेल्या आठवड्यात रॉकेट सोडलं होतं. ४३ फूट उंच रॉकेट हवेत गेल्यावर उजवीकडे झुकलं आणि वेगाने जमिनीकडे येऊ लागलं होतं. तेही अलास्काच्या तटावर नष्ट करण्यात आलं.
फायरफ्लायचं मुख्यालय टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये आहे. कंपनीने सांगितलं की, ते अमेरिकन संघीय एजन्सीसोबत मिळून याचा शोध घेत आहेत की, रॉकेटमध्ये गडबड काय झाली. जेणेकरून पुढील रॉकेटमध्ये चूक सुधारता येईल. कंपनीने ट्विटरवर जारी केलं की, आम्हाला मिशनमध्ये हवं ते यश मिळालं नाही. पण बऱ्याच गोष्टी समजल्या. आमचं इग्निशिअन योग्य होतं. लिफ्टऑफ योग्य होतं. लॉंचिग योग्य होतं. सुपरसोनिक स्पीडपर्यंत जाण्याची प्रक्रिया योग्य होती.