शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

अमेरिकेत १०० भारतीय घुसखोरांची तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:23 AM

अमेरिकेच्या दक्षिण भागातील सीमा ओलांडून त्या देशात बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या सुमारे १०० भारतीय नागरिकांना स्थलांतरितांसाठीच्या दोन तुरुंगांमध्ये सध्या डांबून ठेवले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दक्षिण भागातील सीमा ओलांडून त्या देशात बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या सुमारे १०० भारतीय नागरिकांना स्थलांतरितांसाठीच्या दोन तुरुंगांमध्ये सध्या डांबून ठेवले आहे. यात बहुतांश पंजाबमधील रहिवासी असून ते शीख व ख्रिश्चनधर्मीय आहेत. त्यांच्याशी भारताच्या अमेरिकेतील दूतावासाने संपर्क साधला आहे. त्यातील ५२ भारतीय न्यू मेक्सिकोच्या तुरुंगात तर ४०-४५ नागरिक हे ओरेगन येथील तुरुंगात आहेत.भारताच्या अमेरिकेतील दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या एका अधिकाऱ्याने न्यू मेक्सिकोतील तुरुंगाला भेट दिली असून ओरेगन येथेही लवकरच अधिकारी जातील. न्यू मेक्सिको येथील तुरुंगात काही महिन्यांपासून १२ भारतीयांना ठेवले आहे. यातील बहुतेक लोक अमेरिकेत आश्रय मागत असून, भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचार व अत्याचाराला कंटाळून आम्ही इथे आलो आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे.नॉर्थ अमेरिकन पंजाबी असोसिएशनचे पदाधिकारी सतनामसिंग चहल म्हणाले की, अमेरिकेच्या तुरुंगांत भारतीय घुसखोरांपैकी बहुतांश पंजाबचे रहिवासी आहेत. २०१३ ते २०१५ या कालावधीत सीमा ओलांडून बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याबद्दल २३ हजार भारतीयांना अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)