वॉशिंग्टन : अमेरिकी लष्करातील १०० जणांची नावे व अमेरिकेतील त्यांचे पत्ते इसिसने आॅनलाईन प्रसिद्ध केले असून, अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या समर्थकांनी या १०० जणांना ठार मारावे, असे आवाहन केले आहे. पेंटगॉन या प्रकाराची चौकशी करीत आहे. ही नावे व पत्ते यांची माहिती हॅकिंगद्वारे मिळाली, असा इसिसचा दावा आहे; पण अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते ती सार्वजनिक वेबसाईटवर होती. ज्यांची नावे या यादीत आहेत, त्यांनी अमेरिकेतर्फे इसिसविरोधी लढाईत भाग घेतला होता, असे इस्लामिक स्टेटच्या हॅकिंग विभागाचे म्हणणे आहे. इसिसवर हल्ले केल्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरून ही नावे घेतली, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)येमेनमधून ‘घर वापसी’अमेरिकाने येमेनमधील एका तळावरील आपल्या सैनिकांना मायदेशी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. येमेनमधील वाढत्या अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हे पाऊल उचलले असल्याचे सूत्रांनी सांगितले. येमेनच्या अधिकाऱ्यांच्या मते, १०० अमेरिकी सैनिक अल् अनद तळावरून परतत आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी येमेनची राजधानी सना येथे आत्मघाती बॉम्बस्फोटात १३७ जण मारले गेले होते. इस्लामिक स्टेट अर्थात इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.अमेरिकी सैन्याद्वारे येमेनच्या सुरक्षा दलास अल्-काईदाविरोधातील लढ्यासाठी प्रशिक्षण दिले जात होते. अल् अनद हवाई तळावर हे प्रशिक्षण होत असे.
१०० अमेरिकी सैनिकांना ठार मारणार -इसिस
By admin | Published: March 23, 2015 2:23 AM