शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सौदी अरेबियात एका वर्षात 101 परदेशी नागरिकांना फाशी; 3 भारतीयांचा समावेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:14 AM

सौदी अरेबियातील कायदे अतिशय कडक आहेत.

Saudi Arabia : सौदी अरेबियातील कायदे आणि आरोपींना दिल्या जाणाऱ्या शिक्षा सर्वात कडक आहेत. अनेकदा सौदीमधील शिक्षेची चर्चा होत आहेत. दरम्यान, आता सौदीमध्ये दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 100 हून अधिक परदेशी लोकांना सौदीने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुन्नी बहुल सौदी अरेबियामध्ये परदेशी लोकांना फाशीची शिक्षा देण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या आकडेवारीने गेल्या दोन वर्षातील विक्रम मोडीत काढले आहेत. नुकतेच येमेनच्या एका नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात शिक्षा झाली आहे.

सौदी अरेबियामध्ये 2023 आणि 2022 मध्ये 34-34 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, परदेशी लोकांना फाशीची शिक्षा देण्याच्या घटनांमध्ये जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. या वर्षी ज्या देशातील लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यामध्ये सर्वाधिक 21 पाकिस्तानचे आहेत. तर तीन भारतीयांचाही यात समावेश आहे. याशिवाय येमेनमधील 20, सीरियातील 14, नायजेरियातील 10, इजिप्तमधील 9, जॉर्डनमधील 8 आणि इथिओपियातील 7 जणांची नावे यादीत आहेत. सुदान आणि अफगाणिस्तानमधील प्रत्येकी तीन आणि श्रीलंका, इरिट्रिया आणि फिलिपाइन्समधील प्रत्येकी एकाला फाशी देण्यात आली आहे.

यावर्षी 101 परदेशी नागरिकांना फाशी शनिवारी एका येमेनी नागरिकाला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि त्याला फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली. यासह 2024 मध्ये 101 परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा देण्याचा विक्रम आखाती देशात निर्माण झाला आहे. ही सर्वात मोठी संख्या आहे.

सौदी अरेबियामध्ये मृत्युदंडाचे सर्वोच्च प्रमाणएएफपी या वृत्तसंस्थेनुसार, सौदी अरेबियामध्ये मृत्युदंडाचे प्रमाण अजूनही सर्वाधिक आहे. फाशीच्या बाबतीत व्यापक सुधारणांची गरज असल्याचा दावा कार्यकर्ते गट करतात. सौदी अरेबियाला अनेक दिवसांपासून फाशीच्या शिक्षेवरून टीकेचा सामना करावा लागत आहे. मानवाधिकार संघटनांनी देखील आखाती राज्याचा निषेध केला आहे. 

सौदी अरेबियामध्ये शिक्षा कशी ठरवली जाते?सौदी अरेबियाच्या इस्लामिक कायद्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तीन श्रेणींमध्ये मृत्युदंडाची तरतूद आहे. यामध्ये किसास (दंडात्मक), हद (अनिवार्य), आणि ताजिर (विवेकापरक) नावांचा समावेश आहे. या श्रेण्यांमध्ये सौदी न्यायालयांकडे फौजदारी गुन्हा आणि मृत्युदंडासह कोणते दंड होऊ शकतात, हे निर्धारित करण्याचे व्यापक अधिकार आहेत. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालय