शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

१०४ वर्षांच्या आजीबाईंचं स्काय डायव्हिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 09:46 IST

फार नवीन काही शिकण्याचं, कुठलं तरी धाडस करण्याचं वय आपण मागे सोडलेलं आहे अशीच बहुतेक सगळ्यांची धारणा असते.

माणसं सेवानिवृत्त होऊन म्हातारी होऊ लागली की हळूहळू त्यांची आयुष्याकडे बघण्याची दृष्टी बदलायला लागते. त्यांचा आयुष्यातील रस कमी होऊ लागतो. काही जण देवाधर्माकडे किंवा अध्यात्माकडे वळतात. काही जण नातवंडांमध्ये रमतात. थोडे काही जण आयुष्यभर राहून गेलेले छंद जोपासायला घेतात. त्यातही बहुतेक वेळा चित्रकला, गायन, वादन, पाककला यासारखे छंद जोपासले जातात. थोडे काही लोक व्यायामाचा अध्याय नव्याने सुरू करतात; पण यापैकी काहीही करणारे असतील तरी ‘उरलेले दिवस शांतपणे घालवणे’ एवढाच हेतू त्यामागे असतो. फार नवीन काही शिकण्याचं, कुठलं तरी धाडस करण्याचं वय आपण मागे सोडलेलं आहे अशीच बहुतेक सगळ्यांची धारणा असते.

ज्येष्ठ नागरिकत्वाच्या या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादी शंभरी पार केलेली व्यक्ती एखादं धाडस करते त्यावेळी सगळ्या जगाच्या नजरा तिच्याकडे लागणं अगदीच स्वाभाविक आहे. डोरोथी हॉफनर नावाच्या १०४ वर्षांच्या आजीबाईंनी नुकतंच असं एक धाडस केलं आणि तेही जमिनीवर राहून नाही तर आकाशात जाऊन. त्यांनी वयाच्या १०४व्या वर्षी स्काय डायव्हिंग केलं. हॉफनर नावाच्या या बाईंनी मुळात पहिल्यांदा स्काय डायव्हिंग केलं ते १०० वर्षे पूर्ण झाल्यावर. पहिल्यांदा आकाशातून इतक्या उंचीवरून उडी मारताना बहुतेक सगळ्यांना विमानातून खाली ढकलून द्यावं लागतं. कारण जमिनीवर असताना कोणी काहीही म्हटलं, तरी काही हजार फूट उंचीवरून जमिनीकडे पहिल्यांदा बघताना जवळजवळ कोणीच सहज उडी मारू शकत नाही. त्यांना अक्षरशः ढकलावं लागतं.

हॉफनर आजीबाईंनी शंभराव्या वर्षी पहिल्यांदा उडी मारली तेव्हा त्यांचीही तीच अवस्था झालेली होती. मात्र, त्यानंतर १०४ वर्षांच्या झाल्यावर जेव्हा त्यांनी विमानातून पॅराशूट बांधून उडी मारली तेव्हा मात्र त्या आपणहून विमानाच्या दारात गेल्या आणि त्यांनी पहिल्यांदा उडी मारली. त्यांना विमानापर्यंत जाण्यासाठी वॉकरची मदत घ्यावी लागली होती आणि पॅराशूट बांधून जमिनीवर यशस्वीरीत्या सुखरूप उतरल्यानंतरदेखील त्यांनी वॉकर घेऊनच पुढची पावलं टाकली. त्यांच्या आधी स्वीडनच्या लिनी इंगगार्ड लार्सन नावाच्या १०३ वर्षांच्या आजीबाईंच्या नावावर जगातील सगळ्यात वयोवृद्ध स्काय डायव्हर असण्याचा विक्रम नोंदवलेला होता. हा विक्रम त्यांनी २०२२ सालच्या मे महिन्यात केलेला होता. मात्र, डोरोथी हॉफनर बाईंनी १ ऑक्टोबर २०२३ या दिवशी उडी मारल्यानंतर त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंदवलं जावं यासाठी ‘स्काय डाइव्ह शिकागो’ प्रयत्न करत आहे.

डोरोथी हॉफनर बाईंचा जन्म १७ डिसेंबर १९१८ साली झाला. त्यांचा जन्म झाला त्यावेळी दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं होतं आणि इन्फ्लुएंझाच्या साथीने जगभरात धुमाकूळ घातलेला होता. डोरोथी हॉफनर यांचंही आयुष्य तसं खडतर होतं. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. त्या काळात त्यांना कॉलेजचं शिक्षण घेणं परवडू शकत नव्हतं. त्यामुळे त्यांनी इलिनॉय बेल नावाच्या कंपनीत मिळेल ती नोकरी करायला घेतली. ही कंपनी पुढे जाऊन ए टी  अँड टी नावाच्या कंपनीत विसर्जित झाली. डोरोथी बाईंनी आयुष्यात कधीही लग्न केलं नाही. त्यांनी आपल्याला मुलं नकोत हेही ठरवलेलं होतं. त्यामुळे त्या आयुष्यभर एकट्याच जगल्या. त्यांचं म्हणणं होतं, “लग्न आणि मुलंबाळं नकोत या निर्णयामुळे त्यांना आयुष्यात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य आणि साहस या दोन्ही गोष्टींचा आनंद घेता आला. त्या त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने जगल्या.

त्यांनी जर्मनीमध्ये डॅन्यूब नदीच्या पात्रात मध्यरात्री नौकाविहार केला. तिथे चांदण्या रात्री आकाशाखाली बसून जेवण केलं आणि नदीचा खळखळाट ऐकला. त्यांना शक्य झालं तेव्हा त्यांच्या निळ्या डॉज कॉरोनेटमधून वीकेंडच्या रोड ट्रिप्स केल्या. मेक्सिकोमध्ये बीचवर सुटी घालवली. सगळं आयुष्य भरभरून जगणं हाच त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र होता. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शंभराव्या वर्षी आणि नंतर १०४ व्या वर्षी स्काय डायव्हिंग केलं. १०४व्या वर्षी स्काय डायव्हिंग केल्यानंतर त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, “मी कोणासमोरही काहीही सिद्ध करण्यासाठी हे करत नाहीये. मी हे करते आहे कारण मला ते करायला मजा येते. पहिल्यांदा स्काय डायव्हिंग केलं तेव्हाही मजा आली होती.”

हॉट एअर बलूनमध्ये बसायचं होतं; पण...डोरोथी  डिसेंबर महिन्यात १०५ वर्षांच्या होणार होत्या. त्या म्हणाल्या होत्या, ‘वाढदिवस झाल्यानंतर मला हॉट एअर बलूनमध्ये बसायला आवडेल. मी त्यात कधीच बसलेली नाहीये.” पण त्यांचा हा प्लॅन मात्र पूर्ण होऊ शकला नाही. स्काय डायव्हिंग करून आल्यानंतर आठवड्याभरातच त्यांचं रात्री झोपेतच निधन झालं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय