शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

106 वर्षे टिकला फ्रुटकेक....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 3:15 PM

1911 साली रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हा फ्रुटकेक आणला असावा असा अंदाज आहे.

ठळक मुद्देया केकबरोबर केप आदारे हटस जवळ अनेक वस्तू सापडल्या आहेत. हंटले अॅंड पामर्सच्या कागदात गुंडाळलेल्या केकबरोबर इतर 1500 वस्तू मिळवणे या ट्रस्टला शक्य झाले आहे.

ख्राइस्टचर्च, दि.12- दोन दिवस जूना पावही किंवा कालची भाकरीही आजकाल दुसऱ्या दिवशी खाल्ली जात नाही. अशा स्थितीत तुमच्या समोर 106 वर्षे जुना पदार्थ समोर ठेवलात तर तुम्ही तो खाल का? पण अंटारर्क्टिकावर संशोधकांना 106 वर्षे जुना केक सापडला आहे. नीट जपून ठेवल्यामुळे हा फ्रुटकेक खाण्यायोग्यही असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचं झालं असं, अंटार्क्टिका हेरिटेज ट्रस्टचे संशोधक तिकडे भटकंती करत असताना त्यांना केप अदारे हट येथे एक व्यवस्थित टिकवून ठेवलेला फ्रुटकेक दिसला. ही जागा 1899 साली तयार करण्यात आली होती आणि 1911 साली रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हा फ्रुटकेक आणला असावा असा अंदाज आहे.या केकवर गुंडाळलेल्या कागदावर अजूनही हंटले अॅंड पामर्स कंपनीची चिन्हे असल्याचे ट्रस्टच्या व्यवस्थापक लिझी मिक यांनी सांगितले. तो केक अजूनही केक नवाच दिसतो. थोडासा तुपाचा ओशट वास सोडला तर तो एकदम सुंदर दिसतो असे मिक यांनी मत व्यक्त केले आहे. तो केक खाण्यायोग्य वाटत असला तरी संशोधकांना तो खाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ज्या डब्यात हा केक होता त्याला आजिबात धक्का लागलेला नव्हता, अतिशय थंड तापमानामुळे तो टिकून राहिला असे मिक यांनी सांगितले.

या केकबरोबर केप आदारे हटस जवळ अनेक वस्तू सापडल्या आहेत. हंटले अॅंड पामर्सच्या कागदात गुंडाळलेल्या केकबरोबर इतर 1500 वस्तू मिळवणे या ट्रस्टला शक्य झाले आहे. या संशोधकांना तेथे मोहीमेत लागणारी अनेक साधनं, हत्यारं, कपडे, सार्डिन मासे, जॅम आणि सडलेले मटण सापडले आहे. संशोधनाची ही सगळी मोहीम 14 महिने चाललल्याचे ट्रस्टने सांगितले आहे. केक आणि इतर वस्तू पुन्हा त्याच जागी ठेवण्यात येणार आहेत. थंड तापमानामुळे हा केक आणखी काही वर्षे टिकू शकेल असे मत मिक यांनी व्यक्त केले आहे.

(रॉबर्ट फाल्कन स्कॉट या अंटार्क्टिका मोहिमेत सामिल झालेल्या संशोधकांच्या पार्टीमधला हा केक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.)

रॉबर्ट फाल्कन स्कॉट कोण होते?रॉबर्ट फाल्कन स्कॉट रॉबर्ट हे ब्रिटिश नौदलातील अधिकारी होते. 6 जून 1868 साली त्यांचा इंग्लंडमधील डेवॉन येथे जन्म झाला. अंटार्क्टिकावर 1901 ते 1904 या काळात त्यांनी डिस्कव्हरी ही मोहीम पूर्ण केली तर 1910 मध्ये त्यांनी टेरा नोव्हा मोहिमेत सहभाग घेतला. पहिल्या डिस्कव्हरी मोहिमेनंतर इंग्लंडमध्ये ते चांगलेच लोकप्रिय झाले. मात्र दुसऱ्या मोहिमेमध्ये दक्षिण ध्रुवाजवळ आल्यानंतर हिमदंशामुळे त्यांचा मृत्यू झाला. फ्रॅास्ट आणि त्यांच्या दोन सहकार्यांचे मृतदेह आठ महिन्यांनी शोधण्यात आले होते. 1948 साली त्यांच्यावर स्कॉट ऑफ द अंटार्क्टिक नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. हा चित्रपट त्यांच्या टेरा नोव्हा मोहिमेवर आधारित आहे.