शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रोज 11.5 लाख मास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:43 PM

फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला, थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 40 लाख मास्क्स तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सनं आता मास्क्सची हीच संख्या आठवड्याला 80 लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे 11.5 लाख मास्क्सची निर्मिती केली जात आहे.

ठळक मुद्देआठवड्याला 80 लाख मास्क्सही पडताहेत कमी.

लोकमत न्यूज नेटवर्कफ्रान्समध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक अचानक सुरू झाला. तो अजूनही थांबलेला नाही. सुरुवातीच्या काळात असलेला वेग थोडासा मंदावला असला, तरी त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. रुग्णांची संख्या वाढतेच आहे आणि मरणारांच्या संख्येतही दररोज भर पडते आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 21 हजार होती. 42,088 रुग्ण बरे झाले, तर आजतागायत तब्बल 21,856 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. तिथे डॉक्टर्सची कमतरता आहे. आरोग्य सेवकांचा तुटवडा आहे. उपकरणांचीही फारच टंचाई आहे. साधे मास्कही मिळणं अवघड झालं आहे.त्यामुळे फ्रान्स सरकारनं युद्धपातळीवर मास्क्स निर्मितीचा निर्णय घेतला असून या आठवड्यापासून मास्कनिर्मिती तब्बल चार पटींनी वाढवली आहे. मास्क्सचा हा आकडाही हादरवणारा आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत दर आठवड्याला, थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 40 लाख मास्क्स तयार केले जात होते, तरीही ते कमी पडत असल्याने फ्रान्सनं आता मास्क्सची हीच संख्या आठवड्याला 80 लाख इतकी वाढवली आहे. तिथे रोज साधारणपणे 11.5 लाख मास्क्सची निर्मिती केली जात आहे. यासंदर्भात फ्रान्सचेच पंतप्रधान एडुआर्ड फिलीप यांनी नुकतंच निवेदन जारी केलं आहे, की आमच्याकडे अजूनही मास्क्सची संख्या अतिशय कमी आहे. प्रत्येक नागरिकाला आम्ही मास्क्स  पुरवू शकत नाही. तरी नागरिकांनी संयम राखावा!.’यामुळे विशेषत: आरोग्य कर्मचार्‍यांना तरी कोरोनापासून काही काळ दूर ठेवता येईल असा फ्रान्सचा कयास आहे.ज्या ज्या पातळीवर जे जे प्रय} करता येतील, त्यासाठी फ्रान्स सरकार आणि तिथले संशोधक झगडत आहेत.फ्रान्सच्या संशोधकांनी कोरोना रुग्णांच्या असंख्य तपासण्याही केल्या आहेत. कोरोनाचा विषाणू कसा आणि का पसरतो, यापेक्षाही कोणामध्ये त्याचा प्रसार कमी होतो, कमी झाला आहे, याबाबतचं एक आश्चर्यजनक निरीक्षण त्यांच्या हाती आलं आहे. फ्रान्सच्या संशोधकांच्या मते धुम्रपान करणार्‍यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी आहे. तंबाकूमध्ये ‘निकोटिन’ हा जो घटक आहे, त्यामुळे कोरोनाला अटकाव होत असावा, असा त्यांचा कयास आहे. अर्थातच कोरोनाला रोखण्यासाठी ‘धुम्रपान करा’ असा सल्ला आम्ही देणार नाही, कारण धुम्रपान करणं अधिक घातक आहे, आणि तुमच्या आरोग्याला त्यापासून अधिक हानी पोहोचू शकते’ असा इशाराही या संशोधकांनी दिला आहे. फ्रान्सच्या पॅरीस हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. या अभ्यासगटाचे प्रमुख आणि प्रसिद्ध न्युरोबायॉलॉजिस्ट जीन पेरी चॅँगुक्स यांनी आपलं निरीक्षण मांडताना म्हटलं आहे, निकोटीनमुळे शरीरातील इतर पेशीत कोरोनाचा झपाट्यानं प्रसार रोखला जात असावा, असं आम्हाला वाटतंय, पण त्यासंदर्भात अजून संशोधन सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या