वेलिंग्टन : १४ वर्षांखालील मुला-मुलींना सिगारेट विकत घेण्यावर बंदी घालणारा न्यूझीलंड जगातील पहिला देश ठरला. १ जानेवारी २००९ वा त्यानंतर जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीस सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकत घेण्यास संपूर्ण बंदी या कायद्याद्वारे घालण्यात आली असून, तो नवीन वर्षात लागू होणार आहे.
५० वर्षे वयावरील लोकांनाही तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होणार नाहीत. त्यासाठीही काही बंधने घालण्यात आली आहेत. अशी विक्री करणाऱ्यांना ११८ लाख रुपयांचा (१.४२ लाख डॉलर) दंड होणार आहे.
कायद्यात म्हटले की, सिगरेट विकत घेण्यासाठीच्या पात्रता वयात दरवर्षी वाढ करण्यात येईल. या देशात किशोरवयीन मुले व युवकांना सिगारेटची विक्री करण्यावर आजीवन बंदी घातली आहे. (वृत्तसंस्था)
धूम्रपान करणाऱ्यांची संख्या घटवणारधूम्रपान करणाऱ्यांच्या प्रमाणात पुढील तीन वर्षांमध्ये ५ टक्क्यांपर्यंत घट करण्याचे न्यूझीलंड सरकारने ठरविले आहे. त्यासाठी कडक कायदा अंमलात येणार आहे. तेथील आरोग्यमंत्री आयेशा वेराल यांनी सांगितले की, कर्करोग, हृदयरोग, पक्षाघातासारख्या आजारांनी असंख्य लोकांचा मृत्यू होतो, त्या गोष्टींची विक्री सुरू ठेवणे योग्य नाही.