शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

इस्रायली हल्ल्यात १२ पॅलेस्टिनी ठार

By admin | Published: August 25, 2014 4:21 AM

गाझामध्ये इस्रायलने रविवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या एका वरिष्ठ वित्त अधिकाऱ्यासह १२ पॅलेस्टिनी ठार झाले

गाझा/जेरूसलेम : गाझामध्ये इस्रायलने रविवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या एका वरिष्ठ वित्त अधिकाऱ्यासह १२ पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष ४८ दिवसांचा झाला असून त्यात आतापर्यंत २,२०० जण ठार तर १०,५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गरज असेल तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील, असे स्पष्ट केले. इस्रायलने गाझातील १३ मजली इमारत रविवारी हवाई हल्ल्यांद्वारे जमीनदोस्त केली. त्याआधी रहिवाशांना तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले होते. गाझातील उंच इमारतींना इस्रायलने लक्ष्य केले आहे. या उंच इमारतींमध्ये दहशतवादी यंत्रणा असून तेथील रहिवाशांनी तेथून दूर जावे, असे इस्रायलच्या वतीने अ‍ॅटोमेटेड फोनद्वारे सांगण्यात येत आहे. उत्तर भागात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ वित्त अधिकारी मोहंमद अल आउल मारला गेला. तीन वरिष्ठ हमास कमांडरानंतर मोहंमदच्या रूपाने हमासचा आणखी एक अधिकारी ठार झाला. जो कोणी आमच्यावर रॉकेट हल्ले करील त्याला कोणालाही सूट मिळणार नाही, असे आम्ही ठरविलेले आहे, असे सांगून नेतान्याहू यांनी इराकमधील इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी गटाशी हमासची तुलना केली. गाझामध्ये आमचे संरक्षणाचे उपाय आमचे उद्दिष्ट गाठले जात नाही तोपर्यंत थांबणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)गेल्या आठ जुलैपासून इस्रायल व हमासदरम्यान सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत २२०० नागरिक मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींमध्ये ७० टक्के सामान्य नागरिक असल्याचे संयुक्त राष्ट्राचे म्हणणे आहे. या काळात ६८ इस्रायली मारले गेले आहेत. (वृत्तसंस्था)