कॅनडा : सार्निया आॅन्टारिओ येथे एक खार वीज निर्मिती केंद्रात भरकटली व सुमारे १२ हजार रहिवाशांना तिने अंधारात लोटले होते. काही तासांत वीज पुरवठा सुरू झाला परंतु खार काही वाचली नाही. ही खार जलविद्युत केंद्राच्या एका भागात भरकटली व तेथील लोकांचा वीज पुरवठा खंडीत झाला. तो सुरू झाला तो दुपारी, असे ब्लूवॉटर पॉवर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅकमायकेल-डेनीस यांनी सांगितले. प्राण्यांमुळे अशा घटना येथे नव्या नसल्या तरी या ताज्या घटनेमुळे फार मोठ्या संख्येतील लोकांची गैरसोय झाली. एखाद्या वीज केंद्राचा अर्धा भाग बंद पाडणे हे प्राण्याकडून क्वचित होते. साधारणत: असले प्राणी फीडर बंद पाडतात व एक हजार ग्राहकांना फटका बसतो.
१२ हजार लोकांना खारीने लोटले अंधारात
By admin | Published: February 25, 2017 11:35 PM