इस्लामाबाद- पाकिस्तानात होत असलेल्या मतदान प्रक्रिया आणि निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी 125 तृतीयपंथींची नेमणूक करण्यात आली आहे. हे तृतीयपंथी मतदान व इतर प्रक्रियेतील पारदर्शकता आणि व्यवस्था यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत.ट्रस्ट फॉर डेमोक्रॅटिक एज्युकेशन अँड अकाऊंटेबिलिटी या एनजीओने निवडणूकेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी काही लोकांना प्रशिक्षित केले आहे. त्यामध्ये या तृतीयपंथींचाही समावेश आहे. यासर्वांची लाहोर, कराची, इस्लामाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
सव्वाशे तृतीयपंथी लक्ष ठेवणार निवडणुकांवर; तपासणार पारदर्शकता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 4:53 PM