पॅरिसमधील नरसंहाराने ब्लॅक फ्रायडेच्या पाश्चात्त्य धारणेला पुन्हा उजाळा मिळाला. शुक्रवार आणि १३ तारीख यांचा संयोग मध्ययुगापासूनच घातक समजला जातो. या दिवसाला काळा शुक्रवार आणि अपशकुनी दिवस समजतात. येशू ख्रिस्ताने त्याच्या सहकाऱ्यांबरोबर जे शेवटचे जेवण म्हणजेच लास्ट सपर घेतले त्या वेळेस १३ लोक उपस्थित होते आणि त्याच्या क्रुसिफिकेशनच्या वेळेसही १३ व्यक्ती उपस्थित होत्या. त्या वेळेपासून १३ आणि शुक्रवार यांच्या युतीला वाईट समजले जाते. या दिवशी घात आणि अपघात होतात अशीही पाश्चात्त्य जगतात समजूत आहे.> पॅरिसमध्ये अतिरेकी हल्ल्यात १२८ ठार पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये इसिसच्या आत्मघातकी हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री (भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता) सहा ठिकाणी केलेल्या युद्धसदृश हल्ल्यातील नरसंहाराने उभे जग हादरले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉइ ओलांद यांनी देशात आणीबाणी व तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करतानाच इसिसवर पलटवार करण्याचा संकल्प सोडला. अत्याधुनिक स्वयंचलित शस्त्रे बेछूटपणे वापरलेल्या आठ अतिरेक्यांनी आत्मघातासाठी पोटाला बॉम्बही लावले होते. तब्बल १२८ निरपराधांचा जीव घेणाऱ्या व १८० जणांनी जखमी करणाऱ्या या अतिरेक्यांपैकी सातजणांनी स्वत:ला बॉम्बने उडवून दिले, तर एकाला पोलिसांनी कंठस्नान घातले. अमेरिकेतील ९/११ वा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची आठवण करून देणाऱ्या या घटनेतील एकही हल्लेखोर जिवंत हाती लागलेला नाही. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतानाच सीरियात नाक खुपसणारा फ्रान्स हे आमचे यापुढेही सर्वोच्च लक्ष्य राहील असा इशाराही दिला. जगभरात कोणीच सुरक्षित नसल्याचा इशारा या हल्ल्याने दिला आहे. यानंतर पॅरिसला अक्षरश: युद्धछावणीचे रूप आले. पोलिसांच्या दिमतीला तातडीने दीड हजार सैनिकांची कुमक देण्यात आली आणि पॅरिसच्या सीमा सील करण्यात आल्या. या हल्ल्याच्या निषेधाचे प्रतीकात्मक तीव्र सूर जगभरात उमटले. पॅरिसचे वैभव असलेल्या आयफेल टॉवरसह सर्व सार्वजनिक वास्तू बंद केल्या. एकीकडे साखळी हल्ल्यांनी पॅरिसमध्ये रक्ताचा सडा पाडणाऱ्या इसिसनेच दुसरीकडे पूर्वेकडील पॅरिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेरूट या लेबेनॉनच्या या राजधानीच्या शहरातही दोन आत्मघाती बॉम्बहल्ले करून ४३ निरपराधांना बळी घेतला.इसिसचा दावा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया तथा इसिसने पॅरीसमधील अतिरेकी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. अरबी आणि फ्रेंच भाषेत आज आॅनलाइन हा दावा करण्यात आला आहे. धिस टाइम, इट्स वॉर!फ्रेंच आणि सर्व पाश्चिमात्य देशांमधील वृत्तपत्रांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. लिबरेशन या प्रसिद्ध वर्तमानपत्राने ह्यद हॉररह्ण असे ठळक शीर्षक देत या हल्ल्याची तीव्रता दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ला पॅरिसिएन या प्रसिद्ध फ्रेंच वर्तमानपत्राने ‘धीस टाईम इट्स वॉर’ या अशा शब्दांमध्ये या हल्ल्याचे वर्णन केले. आता प्रत्युत्तराची वेळ आल्याचे सूचित केले आहे. डेली मिरर, द न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्रांनीही हल्ल्यांचा निषेध करणारी माहिती दिली. मानवतेवरचा हल्ला खूप उशीर होण्यापूर्वीच संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादाची परिभाषा निश्चित करावी. जेणेकरून हे स्पष्ट होईल की, कोण दहशतवादाचे समर्थन करत आहे आणि कोण त्यांच्या विरुद्ध आहे. हा केवळ फ्रान्सवरचा नव्हे, तर मानवतेवरचा हल्ला आहे. मानवतावादी सिद्धांतावरचा हल्ला आहे. त्यामुळे मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान हा हल्ला संपूर्ण मानवतेवरील आणि हृदय पिळवटणारा आहे. निष्पाप लोकांना भयभीत करण्याचा हा अंत्यत संतापजनक प्रयत्न होय. मानवतेच्या शत्रुंना न्यायाच्या दरबारात खेचण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. - बराक ओबामापॅरिसवरील भयानक हल्ला व हिंसाचाराने सुन्न झालो. आमची सहानुभूती आणि संवेदना फ्रान्सच्या जनतेसोबत आहेत. शक्य ती मदत केली जाईल. - डेव्हीड कॅमरून, पंतप्रधान, ब्रिटन जागतिक पातळीवर स्वातंत्र्याचा गोळा घोटण्याच्या इराद्याने करण्यात आलेला हा हल्ला होय. - मकॅलम टर्नबूल, पंतप्रधान, आॅस्ट्रेलियादहशतवादाच्या प्रसारात फ्रान्सच्या चुकीच्या धोरणांनी भर टाकली आहे. फ्रान्सच्या राजधानीवर झालेले अतिरेकी हल्ले आणि लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये अगदी ताजे जे घडले किंवा सीरियामध्ये गेली ५ वर्षे जे काही घडत आहे त्यापासून वेगळे करता येणार नाहीत. - बशिर अल असद, राष्ट्राध्यक्ष, सीरियाव्यभिचाराच्या राजधानीवर आम्हीच केले सुडाने हल्ले - इसिसकैरो- पॅरिसमध्ये १२७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या साखळी अतिरेकी हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (इसिस) स्वीकारली असून यापुढेही फ्रान्स हे ‘आमच्या लक्ष्यांच्या यादीत वरच्या स्थानावर राहील’, अशी धमकीही दिली आहे. पॅरिसवरील हल्ल्यांनी सुन्न झालेले जग सावरण्याच्या आधीच इस्लामिक स्टेटने अरबी आणि फ्रेंच भाषेत एक निवेदन आॅनलाइन प्रसिद्ध करून आपल्या राक्षसी कृतीची कबुली दिली. सीरियन पासपोर्ट सापडलाहल्ल्यात मारल्या गेलेल्या एका हल्लेखोराच्या मृतदेहाजवळ एक पासपोर्ट सापडला असून, तो सीरियाचा पासपोर्ट आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. याबाबत अधिक भाष्य करण्यास पोलिसांनी नकार दिला.
ब्लॅक फ्रायडे, पॅरिसमध्ये अतिरेकी हल्ल्यात १२८ ठार
By admin | Published: November 15, 2015 3:11 AM