तुम्हीही तुमच्या मुलांना फोन देत असाल तर सावधान. कारण फोन देणं तुम्हाला महागात पडू शकतं. चीनमध्ये एका मुलीने ऑनलाईन गेमवर इतके पैसे उडवले ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मुलीने एका ट्रिकचा वापर करून आपल्या आईचं अकाऊंट रिकामं केलं आहे. आईने जेव्हा बघितलं तर लाखो रुपये असलेल्या अकाऊंटमध्ये फक्त काही पैसे शिल्लक होते. ही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या हेनान प्रांतातील ही मुलगी सतत फोनवर असायची. खेळ खेळायची. आईने अनेकवेळा तिला रोखलं पण मुलीने ऐकलं नाही. स्मार्टफोनवर पे-टू-प्ले गेम्सचं व्यसन लागलं होतं. त्यात पैशांची गरज होती म्हणून तिने आईच्या अकाऊंटशी फोन लिंक्ड केला. गेमिंग एपही अकाऊंटशी लिंक केलं. पैसे कापले जाऊ लागले. तरीही आईला कळलं नाही. शिक्षकाने तिला हे करताना पाहिले आणि लगेचच आईला याची माहिती दिली.
52.71 लाख रुपये होते, आता फक्त 5 रुपये शिल्लक
आईने तिचा बँक बॅलन्स तपासला असता तिला मोठा धक्काच बसला. ज्या खात्यात एकेकाळी 449,500 युआन म्हणजेच जवळपास 52.71 लाख रुपये होते, आता त्यात फक्त 5 रुपये शिल्लक आहेत. चीनच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला बँक स्टेटमेंट दाखवताना दिसत आहेत. त्यात त्याच्या मुलीने ऑनलाईन गेमसाठी पैसे देण्यासाठी केलेल्या प्रत्येक व्यवहाराचा तपशील आहे. जेव्हा तिच्या वडिलांनी विचारले की पैसे कुठे खर्च केले, तेव्हा मुलीने जे सांगितले ते ऐकून हैराण झाले.
14 लाख रुपये देऊन ऑनलाईन गेम खरेदी केल्याचं मुलीने सांगितलं. फक्त स्वत: साठीच नाही तर त्याच पैशातून तिने तिच्या 10 मित्रांसाठी गेमही विकत घेतला जेणेकरून ते एकत्र खेळू शकतील. त्यावर सुमारे 12 लाख खर्च झाले. मुलीने अतिशय निरागसपणे सांगितले, आधी मी माझ्या मित्रांना नकार दिला पण जेव्हा त्यांनी पैसे नाहीत म्हटल्यावर मी तो विकत घेतला. मुलीने सांगितले की तिला पैशाबद्दल फारसे काही समजत नाही की ते कुठून आले आणि घरी डेबिट कार्ड मिळाल्यावर तिने ते त्याच्या स्मार्टफोनशी लिंक केलं. आई तिला पैशांची गरज असताना कार्डचा पासवर्ड सांगायची. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.