ऑनलाइन लोकमतकडूना: मध्य नायजेरियामध्ये कुरण आणि पाण्याच्या उपलब्धतेवरुन झालेल्या संघर्षामध्ये १४ जण ठार झाल्याची माहिती मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केली. गत २४ तासात आदिवासी गुराखी आणि ग्रामस्थांमध्ये अनेक चकमका घडल्या आहेत. आधीच इस्लामिक दहशतवादाने ग्रस्त असलेल्या नायजेरियामध्ये गुराखी जमाती आणि ग्रामस्थांमध्ये चकमकी होत असून, पाच वर्षांत ८०० हून जास्त जण मृत्युमुखी पडले आहेत.
नायजेरियात वांशिक संघर्षात १४ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 2:09 AM