ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 25 - पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरमध्ये स्फोट होऊन आज झालेल्या मोठ्या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण गंभीररीत्या होरपळले आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलपूर शहरात ही दुर्घटना घडली.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार बहावलपूरमधील अहमदपूर शरिका येथे राष्ट्रीय महामार्गावर तेल वाहून नेणारा टँकर पलटला. त्यानंतर या टँकरला आग लागली. हा टँकर भरधाव वेगाने जात असल्याने उलटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टँकर उलटल्यानंतर तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी टँकरजवळ गर्दी केली. त्याचदरम्यान हा स्फोट झाल्याने लोक मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
स्फोट झाल्यावर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी काही वेळातच ही आग नियंत्रणात आणली. या आगीची तीव्रता इतकी भयंकर होती की त्यात जवळपास उभ्या असलेल्या 6 गाड्या आणि 12 दुचाकी जळून खाक झाल्या. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी लष्कराला प्रशासनासह मिळून मदत कार्यात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.
At least 100 people burnt to death, 40 injured as an oil tanker catches fire in Bahawalpur city of Pakistan"s Punjab: Pakistan media pic.twitter.com/z7hbQfr9mN— ANI (@ANI_news) June 25, 2017