MV Lila Norfolk to rescue hijacked vessel: सोमालियाच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात लायबेरियन ध्वजांकित मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले होते. एमव्ही लीला नॉरफोक नावाच्या या जहाजामध्ये १५ भारतीय आहेत. माहिती मिळताच भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस चेन्नई या जहाजाला मुक्त करण्यासाठी पाठवले आणि शुक्रवारी दुपारी ते हायजॅक केलेल्या ठिकाणी पोहोचले.
INS चेन्नईची अपहरण झालेल्या जहाजावर कारवाईची सुरुवात
ताज्या माहितीनुसार, आयएनएस चेन्नईने अपहरण केलेले जहाज अडवले असून नौदलाचे मार्कोस कमांडो एमव्ही लीलावर उतरले आहेत. या कमांडोंनी जहाजात कारवाई सुरू केली आहे. सर्व १५ प्रवासी सुखरुप असल्याची माहिती नौदलाकडून घेण्यात आली आहे. याआधी, नौदलाच्या गस्ती विमानाने शुक्रवारी सकाळी अपहरण केलेले जहाज शोधून काढले आणि त्याच्याभोवती राहून विमानाने जहाजाशी संपर्क प्रस्थापित केला.
माहिती मिळताच कारवाईला सुरूवात
या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती ब्रिटीश लष्कराच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) या संस्थेने गुरुवारी दिली. यानंतर भारतीय नौदलाने सक्रियपणे या जहाजाचा शोध घेतला आणि शुक्रवारी सकाळी ते समुद्रात सापडले. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जहाजाच्या चालक दलाने गुरुवारी संध्याकाळी यूकेएमटीओला एक त्रासदायक गोष्टीबाबत संदेश पाठवला आणि त्यांना कळवले होते की पाच-सहा सशस्त्र अज्ञात लोक जहाजावर आले व त्यांनी जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत केला. त्यानंतर भारतीय नौदलाने तत्परता दाखवली आणि अपहरण झालेल्या जहाजाचा शोध सुरू केला. सागरी मार्गात जहाजांची सुरक्षित वाहतूक राखणे हा आता नौदलाचा निर्धार आहे.