ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १३ - पाकिस्तानमधील बलुचिस्तानची राजधानी क्वेटा प्रांतातील पोलिओ लसीकरण केंद्रांवर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात १५ नागरिक मृत्युमुखी पडले, तर इतर 20 जण जखमी झाले आहेत. तोंडातून लस देणे हे धर्माच्या विरोधात आहे असे सांगत काही दहशतवादी गटांकडून येथील पोलिओ लसीकरण केंद्रांवर हल्ले करण्यात येत आहेत.
एका पोलिओ लसीकरण केंद्राबाहेर सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या गाडीजवळ हा स्फोट झाला.
पाकचे स्थानिक वृतमानपत्र 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार सुरक्षा अधिकारी घटना स्थळाची चौकशी करत असून ज्याने आत्मघाती हल्ला घडवला त्या दहशतवाद्याच्या शरीराचे टुकडे एकत्र केले आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने फेसबुक वर पोस्टून आणि काही स्थानिक पत्रकारासमेल पाठवून हल्ल्याची जबाबादारी घेतलेली आहे.
पाकिस्तानात मागील काही महिन्यांपासून पोलिओ केंद्रांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. या हल्लयात, पोलिसांच्या दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. स्फोटातील जखमींना क्वेट्टा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. .