पॅरिस : जर्मन हवाई सेवेचे एक प्रवासी विमान फ्रान्समधील आल्प्स पर्वतावरील स्की रिसॉर्टजवळ कोसळले असून, विमानातील सर्व १५० प्रवासी मरण पावले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एअरबस ए-३२० या विमानातील प्रवासी व कर्मचारी मरण पावले असावेत, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस होलंदे यांनी म्हटले आहे. या अपघातातून कोणी वाचले असण्याची शक्यता नाही, असे अध्यक्ष होलंदे यांनी पत्रकारांना सांगितले. स्पेनचे किनारपट्टीचे शहर बार्सिलोना येथून हे विमान जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ शहराकडे निघाले होते. आग्नेय फ्रान्समधील बार्सिलोनेटे भागात ते कोसळले. या विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.४७ वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी १५.१७ वाजता) संकटाचा कॉल दिला होता. या विमानात १४२ प्रवासी व सहा कर्मचारी होते. जर्मन हवाई सेवा जर्मनविंगचे हे विमान होते. ही लुफ्तान्सा या विमानसेवेची कमी दरात चालविली जाणारी विमानसेवा आहे. एकेरी आयजल असणाऱ्या या ए- ३२० विमानात १५० ते १८० लोक बसू शकतात. फ्रान्सचे गृहमंत्री बर्नार्ड काझेनवू हे अपघात स्थळाकडे चालले असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आधीच मिळाले आहेत. अपघाताचे वृत्त येताच अपघातग्रस्त विमानसेवेत शेअर्स असणाऱ्या एअरबस या युरोपियन कंपनीचे शेअर्स १.७७ टक्के कोसळून ५८.९४ युरोवर आले आहेत. सकाळी ११ वाजता हे शेअर्स २ टक्के कोसळले होते. नंतर ते थोडे सावरले.धोक्यात असतानाच्या सिग्नल्सनी विमान अपवादात्मक अशा पाच हजार फूट उंचीवर उडत असल्याचे दाखविले, अशी माहिती वाहतूक मंत्री अलॅन विदालाईज यांनी सांगितली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते संकटात असल्याचे विमानाशी असलेल्या शेवटच्या संपर्कातून समजले, असेही हा मंत्री म्हणाला. (वृत्तसंस्था)४प्रवाशांत मोठ्या संख्येने स्पेनचे नागरिक असल्यामुळे स्पेनचे राजे फिलीप (पाचवे) त्यांचा फ्रान्सचा दौरा अर्धवट टाकून मायदेशी परतले आहेत. अपघातस्थळ अतिशय दुर्गम असल्यामुळे बचावपथकाला अनेक तास तेथे पोहाचता आले नाही, असे फ्रन्कॉईस होलांद यांनी सांगितले. ४अपघात झाला त्या ठिकाणी प्रचंड बर्फ असून तेथे वाहनांनी पोहोचणे अशक्य असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.
विमान कोसळून १५० ठार?
By admin | Published: March 25, 2015 1:33 AM