रशिया आणि युक्रेनमध्ये आता आरपारची लढाई सुरु झाली आहे. काहीशी सुस्त पडलेली रशियन सेना आता युक्रेनवर जोराने प्रहार करू लागली आहे. युक्रेनी सैन्याने रशियाचा पूल पाडल्याचा दावा केला जात आहे. यामुळे रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युक्रेनने नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. या साऱ्या घडामोडींवर रशियाने युक्रेनला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. असे असताना युक्रेनमध्ये लोकांचे काहीतरी वेगळेच सुरु आहे.
युक्रेनी लोक राजधानी कीव्हच्या बाहेरील डोंगरावर एक मोठा इव्हेंट करणार आहेत. रशियाने अण्वस्त्र हल्ला केला, की हे लोक त्या डोंगरावर सेक्स पार्टी करणार आहेत. टेलिग्रामवर यासाठी १५ हजारहून अधिक लोकांनी रजिस्ट्रेशनही केले आहे. येरुशलेम पोस्टच्या वृत्तानुसार ही पार्टी शहराच्या बाहेर असलेल्या एका डोंगरावर होणार आहे. या ठिकाणी लोक हातांमध्ये रंगीत पट्ट्या बांधणार आहेत. असे केल्याने इथे जमणारे लोक त्यांचा 'सेक्सुल इंटरेस्ट' दाखवतील. तीन पट्ट्या आणि चार पट्ट्या असा प्रकार असणार आहे. आयोजकांच्या दाव्यानुसार या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी युक्रेनी लोक अण्वस्त्रविरोधी बंकरांमधून बाहेर पडणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या इव्हेंटला युक्रेनी जनतेतून मोठे समर्थन मिळत आहे.
हे कशासाठी? एका स्थानिक महिलेने रेडिओ फ्री युरोपला दिलेल्या मुलाखतीत यामागचे कारण दिले आहे. ही कृती आशावादी युक्रेनियन भावनेवर आणि युद्ध जिंकण्याच्या त्यांच्या शक्यतांबद्दल आपला आत्मविश्वास दर्शवित आहे. हे निराशेच्या विरुद्ध आहे. अगदी वाईट परिस्थितीतही लोक काहीतरी चांगले शोधत आहेत, असे तिने म्हटले आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ही रशियाचा धमकीला प्रत्यूत्तर असणार आहे. ते आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करतील, त्याचे आम्ही यात रुपांतर करून त्यांना दाखवून देऊ.
असे असले तरी युक्रेनी लोकांमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची भीती बसलेली आहे. सरकारी यंत्रणा देखील आता युक्रेनमध्ये पोटॅशिअम आयोडाईडच्या गोळ्या वाटू लागली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी यंत्रणा निवारा केंद्रांची उभारणी करत आहेत. अणू बॉम्बचा हल्ला झालाच तर लोकांना त्यात लपून राहता येईल. पोटॅशिअम आयोडाईडच्या गोळ्या थायरॉईड ग्रंथींमध्ये खतरनाक रेडिएशन रोखण्यापासून वाचवितात.