शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

गोळ्या घालून 16,000 हजार घोड्यांना ठार केले जाणार, ऑस्ट्रेलियाने का घेतला हा निर्णय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 8:18 PM

ऑस्ट्रेलियन सरकारने 16000 हजार घोड्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडनी: ऑस्ट्रेलियातील सरकारने एक विचित्र निर्णय घेतला आहे. घोड्यांची संख्या कमी करण्यासाठी हजारो घोड्यांना गोळ्या घालून ठार केले जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील घोड्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने हेलिकॉप्टरमधून त्यांना शूट केले जाईल. दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियातील कोशियस्को नॅशनल पार्कमधील घोड्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या राष्ट्रादीय उद्यानात सुमारे 19,000 जंगली घोडे आहेत, ज्यांना "ब्रम्बी" म्हणून ओळखले जाते. न्यू साउथ वेल्स राज्य अधिकारी 2027 च्या मध्यापर्यंत ही संख्या 3,000 पर्यंत कमी करू इच्छितात. त्यामुळेच घोड्यांना मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. घोड्यांची संख्या कमी करण्यासाठी अधिकारी आधी घोड्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु न्यू साउथ वेल्सचे पर्यावरण मंत्री पेनी शार्प म्हणाले की, हा उपाय आता पुरेसा नाही.

वन्य घोड्यांच्या मोठ्या संख्येमुळे संपूर्ण पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे आता त्यांना ठार केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विशेष म्हणजे, गेल्या 20 वर्षांत जंगली घोड्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे ते जलमार्ग अडवतात आणि मूळ प्राण्यांचे निवासस्थान नष्ट करतात. गेल्या वर्षी NSW सरकारने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय उद्यानात जंगली घोड्यांची संख्या 18,814 पर्यंत होती. कठोर उपाययोजना न केल्यास पुढील दशकात घोड्यांची संख्या 50,000 पर्यंत वाढू शकते, असे पर्यावरण गटांनी यापूर्वी म्हटले आहे.

ब्रम्बी पर्यावरणाला कसे हानी पोहोचवतात?ब्रम्बी किंवा जंगली घोडे जलमार्ग आणि झाडीपट्टीचा नाश करतात. हे मूळ वन्यजीवांना मारतात, ज्यात कोरोबोरी बेडूक, रुंद-दात असलेले उंदीर आणि दुर्मिळ अल्पाइन ऑर्किडचा समावेश आहे. NSW सरकार जंगली घोड्यांची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी ग्राउंड शूटिंग, ट्रॅपिंग आणि रीहोमिंगवर अवलंबून आहे, परंतु हे पुरेसे नाही. म्हणूनच NSW पर्यावरण मंत्री पेनी शार्प यांनी ऑगस्टमध्ये घोड्यांना हेलिकॉप्टरद्वारे गोळ्या घालून ठार करण्याचा प्रस्ताव मांडला.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू