शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

धक्कादायक! रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 ठार, 3 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 3:31 PM

रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. 

नवी दिल्ली : चीनमधील चांगचुन शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी लागलेल्या आगीत तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. तेथील स्थानिक प्रशासनाने Weibo सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.40 वाजता चांगचुन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि दुपारी 3 वाजेपर्यंत मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, तसेच प्रशासनाद्वारे पीडितांची काळजी घेतली जात आहे. या घटनेच्या कारणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चांगचुन शहर हे वाहन उत्पादन केंद्र आणि जिलिन प्रांताची राजधानी आहे.

दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी चीनमधील चांग्शा शहरातील एका गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. मात्र सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. माहितीनुसार, या इमारतीमध्ये सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय होते. 42 मजली इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 36 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यासह 17 अग्निशमन केंद्रांमधून 280 हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले.

टॅंकरच्या धडकेत लागली होती आगमागील काही दिवसांपासून चीनमध्ये आगीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. 21 सप्टेंबरच्या दिवशी देखील एका भीषण आगीचा व्हिडीओ समोर आला होता. चीनच्या अनहुई प्रांतात सिलिकॉन तेलाच्या टँकरला झालेल्या धडकेनंतर ही आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाळा आणि आकाशात काळ्या धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते. एक्स्प्रेस वेवर सिलिकॉन ऑईल टँकर आणि अन्य वाहनाची धडक झाल्याने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :chinaचीनfireआगDeathमृत्यूFire Brigadeअग्निशमन दल