इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून तोरखम सीमेवरून ६,५०० पेक्षा अधिक अफगाण नागरिकांना रविवारी देशाबाहेर काढण्यात आले. यामुळे पाकिस्तानातून हाकलून दिलेल्या अफगाण नागरिकांची एकूण संख्या १ लाख ७० हजारांपेक्षा अधिक झाली आहे.सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत पाक सोडण्याचे आदेश दिले होते आणि तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.
कैद्यांनाही परत पाठवलेअफगाणिस्तानात स्वेच्छेने परतणाऱ्या लोकांव्यतिरिक्त, किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंगात असलेल्या कैद्यांनाही परत पाठवले. मायदेशी परतण्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी अफगाण कुटुंबांना दिले आहे.
पाकवर टीका...लाखो अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर ढकलण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी टीका केली आहे.