ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 17 - भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी (दि.14) उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने मंगळवारी दिली आहे.
लिबियातून 180 हून अधिक निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटली. या बोटीतील 180 जण बेपत्ता झाले असून चार जणांचा मृत्यू झाला, असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय निर्वासित संघटना आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीने याच बोटीच्या आपत्तीपासून वाचलेल्या चौघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिली आहे.
बोटीच्या अपघातानंतर हे चौघे दक्षिण इटलीच्या त्रपणी सिसिलिएन किना-यावर धडकले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सर्व निर्वासित शुक्रवारी लिबियातून निघाले असता भूमध्य सागरात ही घटना घडली. दरम्यान, वाचलेल्या चौघांपैकी दोघे इरिट्रियाचे आणि दोघे इथिओपियाचे असल्याचे समजते.