अंकारा - तुर्कीने सीरियावर ड्रोन हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये 19 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तुर्कीने रविवारी सीरियाचे दोन फायटर जेट पाडले. न्यूज एजन्सी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की सैन्याने सीरियावर ड्रोन हल्ला केला असून यामध्ये 19 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
तुर्कीने रविवारी सीरियाचे दोन फायटर जेट पाडले. यामुळे आता रशिया आणि तुर्कीमधील तणाव आणखी वाढला आहे. उत्तर-पश्चिम सीरियातील इदलिब प्रांतात अनेक आठवडे सुरू असलेल्या हिंसाचारानंतर गेल्या आठवड्यात सीरिया हवाई हल्ल्यात अनेक तुर्की सैनिक मारले गेले. त्यानंतर तुर्कीने रशिया समर्थक सीरिया सेनेविरोधात एक लष्करी मोहिम सुरू केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
India vs New Zealad, 2ndTest: न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
कोरोनाचे संकटही भारतासाठी इष्टापत्ती, निर्यात बाजारात चीनची जागा घेण्याची संधी
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
दंगलीसाठी ईशान्य दिल्लीच का?, अरुंद रस्ते व निमुळत्या गल्ल्या सोयीच्या