पोर्ट लुईस : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्या दिवशी प्रार्थनेमध्ये सहभागी होण्यासाठी मॉरिशस सरकारने हिंदूधर्मीय कर्मचाऱ्यांना दोन तासांची विशेष रजा जाहीर केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत सरकारी खात्यांतील हिंदूधर्मीय कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्यात आली आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे, असे जगन्नाथ यांनी म्हटले आहे. माॅरिशसमध्ये हिंदूधर्मीय बहुसंख्येने आहेत. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार मॉरिशसमधील एकूण लोकसंख्येपैकी ४८.५ टक्के लोक हे हिंदू आहे.
ब्रिटिशांनी भारतीयांना नेले माॅरिशसमध्येमॉरिशसमध्ये फ्रेंच, ब्रिटिशांमुळे भारतीयांचे येणे झाले. १९व्या शतकात मॉरिशसमधील उसाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी ब्रिटिशांनी महाराष्ट्र, बिहार, यूपी इत्यादी राज्यांतून भारतीयांना मॉरिशसमध्ये नेले.