शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

युक्रेनमधील २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियात नेले; वोलोदिमीर जेलेन्स्की यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 7:51 AM

युक्रेनच्या अनाथाश्रमांमधील मुलांनाही रशियाच्या लष्कराने बळजबरीने आपल्या देशात नेले आहे.

कीव्ह : युक्रेनमधील सुमारे २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियामध्ये नेण्यात आले आहे, असा खळबळजनक आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला आहे. ही मुले संपूर्ण रशियाभर विखुरली गेली असून, त्यांचा पालकांशी, कुटुंबीयांशी काही संपर्क उरलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

जेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनच्या अनाथाश्रमांमधील मुलांनाही रशियाच्या लष्कराने बळजबरीने आपल्या देशात नेले आहे. हा केवळ माणसांचे अपहरण करण्याचा मामला नाही तर युक्रेनपासून या मुलांची नाळ तोडण्याचे कारस्थान रशियाने रचले आहे. या मुलांना युक्रेनला कधीच परतता येणार नाही, अशी व्यवस्था रशियाने केल्याचा आरोपही जेलेन्स्की यांनी केला. त्यांनी एका व्हिडिओ फितीमध्ये म्हटले आहे की, मुलांना पळवून नेण्याचे कृत्य करणाऱ्यांना युक्रेन भविष्यात शिक्षा देईल. पण, सर्वप्रथम आम्ही रशियाचा रणांगणात पराभव करणार आहोत. युक्रेनची जनता कधीच शरणागती पत्करणार नाही. तसेच आमची मुले कोणाचे गुलाम बनून राहणार नाहीत हे नक्की आहे. 

जेलेन्स्की म्हणाले की, युद्धात युक्रेनमधील २४३ हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. ४४६ मुले जखमी तर १३९ मुले बेपत्ता आहेत. रशियाच्या सैनिकांनी युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतला आहे. तेथील सध्याची नेमकी परिस्थिती कशी आहे, याची युक्रेन सरकारला कल्पना नाही. त्यामुळे युद्धात ठार व जखमी झालेल्या मुलांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. युक्रेनमध्ये युद्धात ठार झालेल्या मुलांपैकी ११ जणांची नावे जेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात घेतली. या मुलांचा मृत्यू कसा झाला हे सविस्तरपणे सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया