बखमत : रशिया-युक्रेन युद्धात माेठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली आहे. त्यात मारियुपाेल शहराला सर्वाधिक किंमत माेजावी लागली आहे. या शहरात एकेका इमारतीच्या मलब्याखालून सुमारे १०० मृतदेह आढळत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे मृत्यूचा न थांबणारा काफिला, असे या मृत्युतांडवाचे वर्णन युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केले. मारियुपाेल शहर सध्या रशियाच्या ताब्यात आहे. मारियुपाेलच्या लढ्यात किमान २१ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. प्रत्येक इमारतीखाली ५० ते १०० मृतदेह असल्याचे अधिकारी म्हणाले.
डाेनबाससाठी तुंबळ युद्धरशियाने पूर्व युक्रेनमधील डाेनबासकडे माेर्चा वळविला आहे. रशियाला युक्रेनच्या सैन्याकडून कडवा प्रतिकार हाेत आहे. त्यामुळे रशियाला अपेक्षित यश मिळालेले नाही. रशियाने कीव्ह शहराच्या पश्चिमेकडील युक्रेनच्या एका लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला चढविला. तेथे बाहेरून आणलेल्या लाेकांना युक्रेन प्रशिक्षण देत असल्याचा दावा रशियाने केला. (वृत्तसंस्था)